Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

हनुमान मंदिर निर्मिती भूमिपूजन सोहळा उत्साहात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         संकटमोचक, परम रामभक्त, तारणहार पवनपुत्र बजरंग बली मंदिर निर्मिती सोहळा गवराळा येथिल स्वराज नगर येथे मोठ्या उत्सवात व भक्तीमय वातावरणात पार पडला. मंदिर निर्मिती करीता सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असणारे ले आऊट मालक ऍड. युवराज धानोरकर यांनी योग्य सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

याप्रसंगी प्रसिद्ध व्यावसायिक व दानशूर श्री. निलेशजी गुंडावार यांचे हस्ते विधीवत पूजनाने भूमिपूजन करण्यात आले. मंदिर निर्मिती हि हनुमान जन्मोत्सव पूर्वी करण्याचा मानस स्वराज नगरी येथिल नागरिकांनी व्यक्त केला. सर्व गवराळा वासी व हनुमान मंदिर निर्मिती समितीच्या सदस्यांनी सोहळा संपन्न करण्यास विशेष सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये