ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शरदराव पवार महाविद्यालयात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यावर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचे चर्चासत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 येथील शरदराव पवार कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या वतीने गोंडवाना विद्यापीठाच्या निर्देशानुसार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत स्कूल कनेक्ट 2.0 या विषयांवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकाचे चर्चासत्र आयोजित करण्यात आले या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजयकुमार सिंह तर मार्गदर्शक म्हणून विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. संजय गोरे, महाविद्यालयाचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण समन्वयक डॉ. शरद बेलोरकर, महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी समितीचे अध्यक्ष प्रा. आशिष देरकर तर विशेष अतिथी म्हणून डॉ. सरोज दत्ता, उपप्राचार्य प्रा. प्रफुल माहुरे,मुख्याध्यापक श्री महेंद्र ताकसांडे,सेवानिवृत्त प्राचार्य धर्मराज काळे इत्यादी मान्यवर प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होते.

       यावेळी अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ.संजय कुमार सिंह म्हणाले राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा मुख्य उद्देश शिक्षण व्यवस्थेत सुधारणा व गुणवत्ता वाढविणे आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य विकास करून त्यांच्यात गंभीर विचार व सर्जनशीलता वाढवणे होय. यावेळी त्यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी सविस्तर विवेचन केले. आपल्या प्रास्ताविकातून डॉ. संजय गोरे यांनी सदर चर्चा सत्राच्या आयोजनाची भूमिका विशद करून नवीन शैक्षणिक धोरणाची मुळे आत्मनिर्भर आणि रोजगार संपन्न अभ्यासक्रमाची निर्मिती करून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हा प्रमुख उद्देश शैक्षणिक धोरणाचा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी महाविद्यालयिन सोयी सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली.

      राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. शरद बेलोरकर यांनी शैक्षणिक धोरणातील अभ्यासक्रमावर मध्ये समाविष्ट असलेल्या विषयाची माहिती देऊन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास व रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचे सांगितले यावेळी त्यांनी अभ्यासक्रम ,अंतरिक गुणवत्ता,क्रेडिट सिस्टम, विद्यापीठांतर्गत विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध कल्याणकारी योजना तसेच शिष्यवृत्ती याविषयी सविस्तर माहिती दिली. यावेळी माजी विद्यार्थी समिती अध्यक्ष प्रा.आशिष देरकर यांनी महाविद्यालयाच्या गुणवत्तेची व सोयी सुविधेची प्रशंशा करून विद्यार्थ्यांनी सदर महाविद्यालयात प्रवेश घ्यावा असे आव्हान केले.या कार्यक्रमाच्या निमित्ताने सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.धर्मराज काळे यांचा महाविद्यालयाच्या वतीने शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.

      या कार्यक्रमाचे संचालन व आभार इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सुनील बिडवाईक यांनी केले. या कार्यक्रमाला महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय,सावित्रीबाई फुले कनिष्ठ महाविद्यालय, संजय गांधी कनिष्ठ महाविद्यालय पेलोरा महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय सोनुर्ली, शरदचंद्र पवार कनिष्ठ महाविद्यालय गडचांदूर व नांदगाव येथील कनिष्ठ महाविद्यालयाचे बहुसंख्य शिक्षक उपस्थित होते आणि स्नेहभजनाने चर्चासत्राचा समारोप करण्यात आला.

यावेळी चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये