गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावंगी मेघे पोलिसांकडून पांढरकवडा पारधी बेडा येथे वॉश आउट मोहीम

एकूण १ लाख ३५ हजाराचा मुद्देमाल नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर या प्रमाणे आहे की, मुखबीरचे खात्रीशीर खबरेवरून पंच व पो. स्टाफसह मौजा पांढरकवडा पारधी बेडा येथे वॉश आउट मोहीम राबविली असता, मोहिमे दरम्यान पारधी बेड्यालगत नमुद आरोपी हे गावठी मोहा दारुची भट्टी लावुन गावठी मोहा दारु गाळताना दिसुन आले, त्यांचेवर छापा टाकला असता अंधाराचा फायदा घेवुन पसार झाले घटनास्थळी  1) दोन लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 100 लीटर उकळता मोहा सड़वा रसायन प्रति लीटर 100 रु प्रमाने 10,000 रु, 2) 5 लोखंडी ड्रममधे 500 लि मोहा रसायन सडवा कि 50,000/ 3) 6 लोखंडी ड्रम 3000/ 4) 2 प्लास्टीक डबकीत 40 लि गावठी मोहा दारु डबकीसह 4,400/5) घमेले व ईतर भट्टी साहित्य कि 2000/रु असा एकुण जु.किं. 69,400 रू. मुद्देमाल 6) बेवारस मोहा सडवा,प्लास्टिक डबकी कि 65,600/, एकूण 1,35,000/- माल मोक्का जप्ती पंचनामा कारवाई प्रमाणे जप्त करून जागीच सि.ए. सॅम्पल तयार करून उर्वरित संपूर्ण मुद्देमाल जागीच पंचासमक्ष नाश करण्यात आला. पो.स्टे. परतीनंतर आरोपी 1) चम्पी फुलमाळी रा. पांढरकवडा पारधी बेडा 2) गोपाल पवार रा. पांढरकवडा पारधी बेडा, ता.जि. वर्धा (पसार)  विरूध्द नमुद कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

    सदर कारवाई मा पोलीस अधीक्षक श्री. हसन सर, मा अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सागर कवडे सर, मा. उपविभागीय पोलिस अधिकारी सा वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलिस स्टेशन सावंगी चे पो.नी. मा. श्री. धनाजी जळक यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोहवा/582 सतिष दरवरे, पो.हवा./747 विजय पंचटिके, पो.हवा./1214 प्रविण बोबडे व 04 गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी केली

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये