ताज्या घडामोडी

विद्यार्थांकडून पोलीस बांधवांना राखी बांधून रक्षाबंधन साजरी

अभाविप नांदा फाटाचा उपक्रम

चांदा ब्लास्ट :

नांदा फाटा: भारतीय संस्कृतीत सण, उत्सव यांना अनन्यसाधारण महत्व आहे. सर्वधर्म समभाव, ऐक्य, निरपेक्ष, निस्वार्थ, आपलेपणा जपणारे सण, उत्सव साजरे करून एकनिष्ठ असल्याची जाणीव या माध्यमातून होते.
रक्षाबंधन हा बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असणारा सण आहे. या दिवशी बहीण भावला राखी बांधून आपले रक्षण करण्यासाठी साकडे घालते,भाऊ हातातील राखीचा धागा म्हणजे बहिणीचे रक्षण करण्याची जबाबदारीची जाणीव करून देणारा असल्याचे विचार आत्मसात करतो.
हा उत्सव सगळीकडे आनंदात साजरा होत असला तरी आपल्या सर्वांचे रक्षण करणारे महाराष्ट्र पोलीस दलातील गढ़चांदूर पोलिस व वाहतूक शाखेतील पोलीस दादांना विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीने पोलीस ठाण्यातील परिसरात जाऊन त्यांना औक्षण करून त्यांना रक्षणाचे बंधन बांधले. तसेच या रक्षाबंधन पर्वाच्या औचीत्याने सर्वसमभाव, आणि संस्कृतीचे जतन करण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नांदा फाटा तर्फे हे अनोखा उपक्रम गढ़चांदूर तसेच जिल्हयातील विविध शाखेत चालविल्या गेला.
या वेळी अभाविप नांदा फाटा तर्फे गढ़चांदूर पोलीस, तसेच शहर वाहतूक नियंत्रण शाखा येथे हा उपक्रम गुरूवार 1 सितंबर रोजी चालविल्या गेला.
यावेळी भाग संयोजक रविन्द्र वर्मा,गढ़चांदूर अध्यक्ष प्रदीप तिवारी ,अनामिका शील,प्राची बोबडे, शरवरी डाहुले,नम्रता मडावी,साहिल शेरे ,भुवन भोयर व साहिल हल्दकर कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये