ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरोगामी शिक्षक संघटनेचे उद्या १२ फेब्रुवारी पासूनचे आंदोलन स्थगित

२९ फेब्रुवारी पर्यंत समस्या निकाली न निघाल्यास आंदोलन करणार

चांदा ब्लास्ट

शिक्षकांच्या सन्मानार्थ पुरोगामी मैदानात सदैव आंदोलन करीत येत आहे. दिनांक १२/०२/२०२४ पासून शिक्षकांच्या प्रलंबीत समस्या निवारण करणेसाठी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पुरोगामी शिक्षक संघटनेचे आंदोलन निश्चित केले होते मात्र दिनांक ९/२/२०२४ ला मान.शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी संघटनेच्या आंदोलनाच्या नोटीसची दखल घेऊन पुरोगामी संघटनेची समस्या निवारण सभेचे आयोजन केले होते. सभेत सकारात्मक चर्चा झाली.

 निवेदनात दिलेल्या समस्यांवर सविस्तर चर्चा झाली. विस्तार अधिकारी शिक्षण ची पदोन्नती चे आदेश सोमवार- मंगळवार पर्यंत निर्गमीत करण्यात येतील असे आश्वासन दिले व मंजुर अंतिम टिपणीवर सही केली. उच्चश्रेणी मुख्याध्यापक ४७ पदे, केंद्रप्रमुख ३७ पदे पदोन्नतीने फेब्रुवारी अखेरीस पर्यंत पदोन्नती आदेश देण्यात येईल असे सांगितले . शैक्षणिक अर्हता, शैक्षणिक सहल मंजुरीचे अधिकार गटविकास अधिकारी यांना देण्यात येईल. ३० जुन ला सेवानिवृत्त होणारे कर्मचारी यांना १ जुलै ची वेतनवाढ प्रस्ताव मंजुर केले असून उर्वरीत ८० प्रस्ताव फेब्रुवारी अखेरीस मंजुर करण्यात येईल.

 आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना एक काल्पनिक वेतनवाढ मंजुरीसाठी प्रस्ताव मागविण्यात येईल. केंद्रप्रमुख पदोन्नतीसाठी ६ वर्ष प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदावर काम केलेले उच्च श्रेणी मुख्याध्यापक यांना पात्र समजण्यात यावे व त्यांचे प्रस्ताव मागविण्यात यावे अशी संघटनेची मागणी साहेबांनी मान्य केली व लगेच पत्र काढले.सोमवार दिनांक १२/२/२०२४ लां गटशिक्षणाधिकारी यांची सभा आयोजित केली आहे. DCPS बंधूच्या पैशाची तफावत दूरूस्त करण्यात येईल असे ठरले. एकस्तर एरिअस बाबतचे पत्र लवकर काढणार असे आश्वासन दिले.यासह एकुण ४० विषयावर चर्चा करण्यात आली.

 यावेळी विजय भोगेकर राज्यनेता डॉ.अल्काताई ठाकरे महिला राज्याध्यक्ष,हरिश ससनकर राज्य सरचिटणीस दिपकभाऊ वर्हेकर जिल्हा सल्लागार,किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष, सुरेश गिलोरकर जिल्हासरचिटणीस, सुनिल कोहपरे जिल्हा कोषाध्यक्ष, विलास मोरे उपाध्यक्ष, जिवन भोयर उपाध्यक्ष, दिवाकर वाघे जिल्हा कार्यालयीन सचिव उपस्थित होते असे जिल्हा प्रसिद्धीप्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी पत्रान्वये कळविले आहे.

शिक्षणाधिकारी साहेबांनी आंदोलन करु नका. सध्या परीक्षेचा कालावधी आहे तसेच विविध उपक्रम आहेत त्यामुळे संप मागे घ्या असा आग्रह केला. काही समस्या प्रलंबित असल्यास मला कळवित चला. फोन करा. मी सहकार्य करीन असे सांगितले. त्यामुळे दिनांक २९/०२/२०२४ पर्यंत समस्या समाधानकारक निकाली न निघाल्यास दिनांक १ मार्च २०२४ पासून साखळी उपोषण करण्यात येईल.

– किशोर आनंदवार

जिल्हाध्यक्ष, म.पु. प्रा.शि.समिती

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये