ताज्या घडामोडी

ठाणेदार असिफरजांच्या धडाकेबाज कारवाईने गुन्हेगारांना भरतेय धडकी

रुजु होताच अवैध दारुसह केला नऊ लाख एंशी हजारांचा मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी

मुन्ना खेडकर बल्लारपूर

नवनियुक्त ठाणेदार असिफरजा बल्लारपूर स्टेशन मध्ये रुजू होताच अवैध व्यवसाय करणाऱ्यांमध्ये दहशत निर्माण होत असुन थानेदरांनी कार्यभार स्वीकारताच अवघ्या 4 तासात मोबाईल दुकान फोडणाऱ्यास अटक करून आपल्या कार्यशैलीची झलक दाखविली तर सायंकाळी दरम्यान पेट्रोलिंग करतांना पेपर मिलच्या न्यू कॉलोनी रोड वर अवैधरित्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथे दारूची वाहतूक करणाऱ्या पिकअप वाहनाला पकडुन दारुसह नऊ लाख एंशी हजारांचा मुद्देमाल जप्त केला.

पेट्रोलिंग करत असताना ठाणेदरांना संशय आल्याने त्यांनी पिक अप वाहन अडवून तपासणी केली असता त्यात एन्शी पेट्या देशी दारू आढळून आली. पोलिसांनी सदर वाहन ताब्यात घेतले असुन हे वाहन चामोर्शी येथील वैशाली ताटपल्लीवार यांची मालकीची आहे असे माहिती मिळाली. सदर कारवाई नवनियुक्त पोलिस निरीक्षक असिफरजा शेख ह्यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण तडी, पि एस आई गोविंद साठे, गजानन डोईफोडे, रणवीजय सिंग ठाकूर, भास्कर कुंदावार, मारोती फुलझेले, बाबा नैताम, गजानन झाडें, विशिष्ट रंगारी, वाभिटकर, कैलास चिंचवलकर ह्यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये