ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या निर्देशांनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना तात्काळ खत पुरवठा

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्या दिवशी १७०० मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध

चांदा ब्लास्ट

आ. श्री. मुनगंटीवार यांच्या निर्देशानंतर झाले जिल्ह्यासाठी नियोजन

जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मानले आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार

राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी निर्देश दिल्यानंतर अवघ्या दोन दिवसांच्या आत खत टंचाईची समस्या सुटली आहे. आ. श्री. मुनगंटीवार यांनी दोन दिवसांपूर्वी बैठक घेऊन प्रशासनाला निर्देश दिले होते, त्यानंतर आज, सोमवार, दि. २२ सप्टेंबरला जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १७०० मेट्रिक टन युरिया उपलब्ध करून देण्यात आला आहे. पुढच्या टप्प्यात उद्या, मंगळवार, दि. २३ सप्टेंबरला १६०० मेट्रिक टन युरिया जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

शेतकऱ्यांपर्यंत वेळेत खत पोहोचावे यासाठी काटेकोर नियोजनाचे निर्देश आ. श्री. मुनगंटीवार यांनी प्रशासनाला दिले आहेत. शेती हंगामाच्या पार्श्वभूमीवर खतटंचाईची चिंता वाढली होती, पण आ. श्री. मुनगंटीवार यांनी घेतलेल्या पुढाकारामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयामुळे आ. श्री. मुनगंटीवार यांची शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी असलेली तत्परता सिद्ध झाली आहे. बल्लारपूरसह संपूर्ण जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊन किसान मोर्चाच्या विनंतीनंतर आ. श्री. मुनगंटीवार यांनी त्यांच्या कार्यालयात खत उपलब्धतेबाबत महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली होती.

बल्लारपूर, भद्रावती, ब्रह्मपुरी, चंद्रपूर, चिमूर, गोंडपिपरी, जीवती, कोरपना, मुल, नागभीड, पोंभुर्णा, राजुरा, सावली, सिंदेवाही आणि वरोरा येथील शेतकऱ्यांसाठी युरिया खत रवाना झाले आहे. युरिया खताचे वाटप काटेकोर नियोजनानुसार प्रत्येक कृषी केंद्रावर तसेच सर्व शेतकऱ्यांपर्यंत खत वेळेत पोहोचेल या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश आ. श्री. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिले होते. त्यानंतर कृषी विकास अधिकाऱ्यांनी जास्तीत जास्त खत विक्रेत्यांपर्यंत वितरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

शेतकऱ्यांनी मानले आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार

शेतकऱ्यांच्या पिकांच्या हंगामी गरजा लक्षात घेता खत उपलब्धतेसाठी प्रशासनाने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात, असे निर्देश आ. श्री. मुनगंटीवार यांनी दिले होते. त्यांनंतर तातडीने अंमलबजावणी करण्यात आली. याबद्दल जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आ. श्री. मुनगंटीवार यांचे आभार मानले आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये