ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अनैशा वाहन चालक कामगार संघटनेची धनेगाव येथे सभा संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

      धनेगाव, (नांदेड जिल्हा) येथील वाहन चालकांनी वाहन चालकांचे संघटन निर्माण करण्याच्या उद्देशाने रविवार दिनांक २१ जानेवारी २०२४ ला वाहन चालक कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी सुरजभाऊ उपरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सतत कार्यरत असलेल्या अनैशा वाहन चालक कामगार संघटनेची सभा स्थळ धनेगाव, नांदेड (जिल्हा) येथे हजारो वाहन चालक कामगारांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

शेख वसीमभाई यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेचे उद्घाटन संघटनेचे अध्यक्ष सुरजभाऊ उपरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून महापुरुषांच्या जयजयकारात व वाहन चालक एकता जिंदाबादच्या नारेबाजीत करण्यांत आले. यावेळी संघटनेचे सल्लागार अशोककुमार उमरे, चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनंताभाऊ रामटेके, जिल्हा सचिव उमाकांत वाघमारे व सचिव संतोष वाघमारे इत्यादी पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.

 सुरजभाऊ उपरे यांनी आपल्या उद्घाटनीय भाषणात मागील दोन वर्षांपासून वाहन चालकांच्या हिताच्या रक्षणासाठी वाहन चालक दिवस व वाहन चालकांना देशाचा दुसरा सैनिक घोषित करण्यात यावे म्हणून केलेल्या आंदोलनाचा व आंदोलनाच्या कार्याचा आढावा घेतला. आगामी काळात वाहनचालक यांचा अपघात होऊन अपंगत्व आल्यास किंवा सजा झाल्यास त्यांच्या परिवाराला आर्थिक मदत करण्याची जबाबदारी अनैशा वाहन चालक कामगार संघटनेशी जुळलेल्या सभासदाची घेत असून यात व्यापकता आणण्यासाठी संघटना लक्ष घालत असल्याचे यावेळी अध्यक्षांनी व्यक्त केले. तसेच वाहन चालकांच्या संरक्षणाकरीता संघटनशक्तीची किती आवश्यकता आहे यांचे मार्गदर्शन केले. यावेळी संघटनेचे महाराष्ट्र सल्लागार व रिपब्लिकन चळवळीचे प्रचारक अशोककुमार उमरे यांनी वाहन चालकांनी आपल्या वाहन चालकांच्या व्यवसायाला प्राधान्य देतानाच देशभर वाहन चालवताना येणाऱ्या संकटांचा प्रतिकार करण्यासाठी व आपल्या अडी अडचणीच्या काळात घराला हातभार लावण्यासाठी संपूर्ण देशात कार्यरत वाहन चालकांची सहकारी पतसंस्था निर्माण करण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यावेळी वाहनचालक यांनी आपल्या कमजोरी आणि गरिबीच्या परिस्थितीस आपल्यातील वाहन चालकांची असंघटितपणाच बहुतांश जबाबदार आहे.

आपल्यात संघटितपणा येऊ नये आणि वाहन चालकांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होऊ नये यासाठी वाहन मालक, वाहतूक संस्था, ट्रान्सपोर्ट कंपनी आपल्या हालचालीवर सतत लक्ष ठेवून आहेत. वाहन चालकांचे संघटन होऊ नये म्हणून दबाव आणला जात असतात. अशा परिस्थितीवर मात करून आपले हक्क आणि अधिकार मिळविण्यासाठी आपल्याला संघटीत होण्याऐवजी दुसरा कोणताही पर्याय, मार्ग नाही असा मोलाचा सल्ला संघटनेचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष अनंताभाऊ रामटेके यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी संतोषभाऊ वाघमारे, उमाकांत वाघमारे, लखन जोंधळे, शेख वसीम, जिल्हाध्यक्ष शेख अय्युबभाई, अहमद खान इत्यादींनी समयोचित मार्गदर्शन केले.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी शेख वसीम, शेख अय्युबभाई, अहमद खान, महेश देशमुख, लखन जोंधळे, महेश राठी, शेख अफरोज, शेख साजीदभाई, अब्दुल वाशीदभाई, इरफान खान, शेख अजीजभाई, अज्जूभाई, ईमरान खान, शेख सलीम, शेख वहाब, शेख अहमद, फिरोज, ऐजाज, सिराज, एम. कलीम, इमरान, युनूस, मोहम्मद कलीम, अफरोज, इनावतुल्ला, खलील, युनूस, अक्रम, आयुब, इरफान, मतीन, जावेद, सलमान, साजीद, सद्दाम, शफीज, वाजिद, सय्यद शेरू, शेख आमेर इत्यादींनी मोलाचे योगदान दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये