ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बोगस पत्राच्या आधारे बरांज आंदोलन कर्त्याचे उपोषण सोडण्याचा प्रयत्न

कोणतीही अटी मान्य न करता तयार केले बराज कोल कंपनीच्या नावाने पत्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

कर्नाटक पावर कार्पोरेशन लिमिटेड (केपीसीएल ) कंपनी विरोधात बरांज येथील प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाचा तोडगा काढण्यासाठी जिल्हा अधिकाऱ्यालयात बैठक झाली त्या बैठकीत जिल्हाधिकार्‍याने केपीसीएल कंपनीला बरांज आंदोलन कर्त्याच्या प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांच्या मागण्याची त्वरित निराकरण करा असे आदेश दिले. मात्र केपीसीएल कंपनीने बरांज कोल माईन्स चे नाव टाकून आंदोलन सोडा असे आंदोलन करणाऱ्यांना पत्र देउन गुमराह करण्याचा प्रयत्न केल्याने आंदोलनकारी पुन्हा आक्रमक झाले आहे .
केपीसीएल कंपनीच्या विरोधात १८ मागण्या घेऊन बरांज प्रकल्पग्रस्ताचे ५४ दिवसापासून आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनाला थांबविण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी देशपांडे यांच्या समक्ष केपीसीएल कंपनीचे अधिकारी व प्रकल्पग्रस्तांच्या वतीने विनोद खोब्रागडे यांची बैठक झाली ही बैठक आंदोलन कर्त्याच्या वतीने समाधानकारक झाली व कंपनीला आंदोलन कर्त्याच्या १२ प्रश्नाचे उत्तर देऊन त्यांच्या मागण्याचे त्वरित निराकरण करण्याचे आदेश दिले. त्यानंतर कंपनीने दिनांक ३ फेब्रुवारीला केपीसीएल किंवा कर्नाटक एम्टा या कंपनीच्या नावाने पत्र तयार न करता त्यांनी बरांज कोल माइन्स च्या नावाने बोगस पत्र काढले व त्यात १८ मागण्या पैकी कोणतीही मागणी मान्य केल्याबाबत उल्लेख नाही आणि जिल्हाअधिकाऱ्यालयात २ फेब्रुवारीला झालेली बैठक संवाद पूर्वक वातावरणात झाल्याचे लिहून बराच पुनर्वसन कर्त्यांनी आंदोलन थांबवावे असे पत्र केपीसीएल कंपनीच्या अधिकाऱ्यांनी देउन दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला मात्र आंदोलन करते पुन्हा भडकले व ज्या पद्धतीने जिल्हा अधिकाऱ्यांनी सांगितले त्याप्रमाणे आमच्या मागण्यांची पूर्तता करा असे आंदोलन कर्त्यांनी ते पत्र घेण्यास नकार दिला व पुन्हा जैसे थे महिलांचे आंदोलन सुरूच आहे.

राजेश वासाडे मॅनेजर कर्नाटक एम्टा – बरांज प्रकल्पग्रस्ताच्या आंदोलन स्थळी पत्र घेवून गेलो होतो मात्र आंदोलकाऱ्यांनी त्या पत्रात १८ मागण्या बाबद कुठेही उल्लेख नाही असे म्हणून पत्र नाकारले

पंचशिला कांबळे – जिल्हा अधीकाऱ्यांनी बैठकीत सांगितल्याप्रमाणे आमच्या मागण्याचे निराकस्न होने आवश्यक होते मात्र ज्या कंपनीशी लढा सुरू आहे त्या कंपनीचे पत्र देण्या ऐवजी बरांज कंपनीचे नाव टाकून त्यात ऐकाही मागव्याचे उलेख नसणारे बोगस पत्र देण्याची प्रयत्न केला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये