Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ग्रामीण रुग्णालय येथे (डॉक्टरविना) रुग्णांंचा उपचार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रमोद गिरडकर

कोरपणा ग्रामीण रुग्णालंय चार वैद्यकीय अधिकारी कार्यरत असून सुद्धा रुग्णांना बरोबर उपचार मिळत नसल्याचे बोलले जात आहे.रात्री येणाऱ्या रुग्णांना उपचारासाठी वैद्यकीय अधिकारी राहत नाही.त्यामुळे रुग्णांना रात्रीच्या वेळी खाजगी दवाख्याण्यात नाईलाजस्व जावे लागत आहे दि. ०१/२/२०२४ ला रात्री ९ वाजत्याच्या दरम्यान कोरपणा येथील मोतीराम मरसकोल्हे ऑटो करून रुग्णालयात तंबेत ठीक नसल्यामुळे उपचारासाठी आला मात्र त्याला मात्र वैद्यकीय अधिकारी हजर नसल्यामुळे रात्री कार्यरत कर्मचारी याने दोन गोळया औषधीची बाटल देऊन डॉक्टर साहेब नाही उदयाला या असे बोलून परत पाठविले ह्या प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालयचा मनमानी कारभर चालत आहे. डॉक्टर विना उपचार होत नाही मात्र कोणाच्या सांगण्याहून येणाऱ्या रुग्णांना औषध उपचार केला जात आहे.

या विचित्र प्रकारामुळे ग्रामीण रुग्णालंय प्रशासन रुग्णाच्या जीवाशी खेळत आहे.रात्री येणाऱ्या रुग्णांना वेळवर उपचार मिळत नाही अशा वारंवार घटना घडत आहे अशा वैद्यकीय अधिकाऱ्यावर कार्यवाही करावी व रुग्णाच्या जीवाशी खेळणे थांबवावे अशी मागणी रुग्ण व नातेवाईकांनी केली आहे. या घटनेची तक्रार माझ्यापर्यंत आली नाही सर्व प्रकरण तपासून नियमाने कारवाई करू असे डॉ.संदीप बांबोडे यांनी पत्रकारांना फोनवर विचारली असता प्रतिक्रिया दिली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये