ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व वाहतूक शाखेतर्फे स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आज दिनांक 4 फेब्रुवारी 2024 रोजी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय वर्धा व वाहतूक शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमानाने रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत 2024 रोजी स्कूल व्हॅन रॅलीचे आयोजन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उपप्रादेशिक परिवहन अधिकारी वर्धा शेख समीर शेख आयुब वर्धा वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक चकाटे व उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मोवानी कवळे मॅडम सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक हेमंत गांवडे राहूल ढोबळे अमर पखान यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले व कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी कार्यक्रमाला उपस्थित असलेले स्कूल बसचे व व्हॅनचे चालक मालक व वाहक उपस्थित होते संघटनेतर्फे वर्धा शहरातील सर्व स्कूल व्हॅन चालक व मालक यांचा समावेश होता रॅलीमध्ये जवळपास 50 स्कूल व्हॅन चा समावेश होता.स्कूल बस संघटनेतर्फे उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये