ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धेत वृक्षारोपणाने मा.प्रा. मनोहर धोंडे सर यांचा वाढदिवस संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

               शिवा अखिल भारतीय वीरशैव युवक संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष व ओ बी सी आरक्षणाचे प्रणेते वीरशैव लिंगायत हृदयसम्राट व सेवा जनशक्ती पक्षाचे पक्षप्रमुख प्रा.मनोहर धोंडे सर यांच्या वाढदिवसानिमित्त 2 फरवरी 2024 रोजी स्थानिक ऑक्सीजन पार्क वर्धा येथे वृक्षारोपण व प्रबोधन कार्यक्रम शिवा संघटना जिल्हा वर्धा च्या वतीने संपन्न झाला.

           सदर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी निसर्ग सेवा समिती वर्धा चे अध्यक्ष मा श्री मुरलीधर जी बेलखोडे हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक मा. श्री हरीश जी इथापे.लोकप्रबोधन कार इंजिनियर मा. श्री भाऊसाहेब थुटे,शिवा संघटना जिल्हाप्रमुख मा. श्री सुरेश पट्टेवार, शिवा शहर महिला आघाडी प्रमुख मा. सौ सविता ताई ढोले व प्रमुख वक्ते म्हणून शिवा संघटनेचे जिल्हा सरचिटणीस मा श्री किरण पटेवार हे होते.

               प्रारंभी प्रा. श्री. मनोहर धोंडे सर व पत्रकार श्री किशोर मानकर यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले.

        त्यानंतर संपन्न झालेल्या कार्यक्रमात सुरुवातीला क्रांतिज्योती महात्मा बसवेश्वर व भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन करन्यात आले.

              याप्रसंगी शिवा संघटनेच्या स्थापने पासून ते 28 वर्षाच्या संघटनेच्या कार्याचे संपूर्ण चित्र आपल्या भूमिकेतून रेखाटण्याचे कार्य प्रमुख वक्ते श्री किरण पटेवार यांनी केले.

                  याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री हरीश इथापे यांनी वर्तमान परिस्थिती पुढील पिढ्या साठी अतिशय वेदनादायी आहे.आपल्या संतांनी दैववादातून प्रयत्न वादा कडे नेण्याचे कार्य आपल्या साहित्यातून आणि प्रबोधनातून केले.तथापि अलिकडले कथाकार विज्ञान युगात अज्ञान पेरण्याचे काम सातत्याने करीत आहे.देशाची लोकशाही अखंडित ठेवणारी आपली घटना बदलविण्याची बाता करून परत हा देश प्रयत्न वादाकडून दैव वादाकडे नेण्याचा किळस वाणा प्रकार अलीकडे खूप मोठ्या प्रमाणात सुरू असून आपसी मतभेद विसरून परत देशाची लोकशाही वाचविण्याचे कार्य वर्तमान पिढीला करण्याचे आवाहन सुद्धा वर्धेतील प्रसिद्ध नाट्य व चित्रपट दिग्दर्शक श्री हरीश इथापे यांनी याप्रसंगी केले.

          लोकप्रबोधन कार तथा इंजिनिअर भाऊसाहेब थुटे व निसर्ग सेवा समितीचे अध्यक्ष श्री मुरलीधर बेलखोडे यांनी आपले समायोचित विचार प्रकट केले.

         सुरुवातीला शिवा संघटनेचे पदाधिकारी विजय लटे यांनी कुटुंब व्यवस्थेवर आपले विचार प्रकट केले.

               यावेळेस लोकमत वर्धा चे पत्रकार तथा माय मॉर्निंग ग्रुप चे सदस्य श्री किशोर मानकर यांचा मंचावरील प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सपत्नीक सत्कार करण्यात आला.

            सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व शिवा संघटना तथा सेवा जनशक्ती बाबत विस्तृत अशी भूमिका शिवा संघटना जिल्हा वर्धा चे सचिव श्री किरण पटेवार यांनी व्यक्त केली.तर संचालन योगगुरू दामोधर राऊत सर व आभार प्रदर्शन वर्धेतील प्रसिद्ध ज्येष्ठ समाजसेवक तथा शिवा संघटनेचे वर्धा जिल्हा प्रमुख श्री सुरेश पट्टेवार यांनी मानलेत.

            कार्यक्रमाला शिवा संघटनेचे वर्धा शहराध्यक्ष श्री विजय पुणेवार, सौ माया विजय पुणेवार,व नाशिक येथून आवर्जून उपस्थित झालेले श्री संजय कोंडेवार ,शिवा संघटना व्यापारी आघाडीचे वर्धा जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद बेलसरे,ईश्वर राखुंडे, प्रकाश वैद्य, अशोक दौड, सिराजर अजानी,बाबाराव भोयर,दिलीप वाकडे इत्यादी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

        अल्पोपहाराणे कार्यक्रमाची सांगता झाली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये