ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा शहरातील वाहन चोरी करणारे आरोपी स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे कडून जाळयात

पोलीस स्टेशन वर्धा शहर व रामनगर येथील एकुण सहा वाहन चोरीचे गुन्हे उघड 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

   मागील काही दिवसांपासून पोलीस स्टेशन वर्धा शहर व पोलीस स्टेषन रामनगर परीसरात मोठया प्रमाणात महागडया किंमतीच्या वाहनांची चोरी होत होती. पोलीसांमार्फत वारंवार शोध घेवून सुध्दा वाहन चोरी करणारे आरोपी बाबत कोणतीही माहीती प्राप्त होत नव्हती.

  स्थानीक गुन्हे शाखा, वर्धा मार्फतीने सदर गुन्हयाचा समांतर तपास सुरू असंताना खात्रीषीर माहीती वरून कारला चैक वर्धा येथून प्रलय षांताराम कदम, वय 19 वर्श, रा. ईतवारा बाजार, वर्धा यास त्याचे विधी संघर्शीत बालक मित्रासह ताब्यात घेवून त्याचे ताब्यातील पांढ-या रंगाचे बिना क्रमांकाचे सुझुकी ऐसेस मोपेड चे मालकी हक्का बाबत व कागदपत्रा बाबत विचारपुस केली असता, त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्याना पोलीसी हिसका दाखविताच प्रलय कदम याने सांगीतले की, तो व त्याचा मित्र साहील सातपुते, रा. वडर झोपडपटट्ी, आर्वी नाका, वर्धा तसेच त्यांचे तिन विधी संघर्शीत बालक मित्रांचे सहायाने प्रियदर्षनी काॅलेज समोरील कॅफे समोरून असेस मोेपेड चोरून आणलेली आहे.

गजानन नगर वर्धा येथून दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल चोरी केलेल्या असून गांधी नगर वर्धा येथून बजाज 220 पल्सर मोटर सायकल तसेच आॅक्सीजन पार्क, आय.टी.आय.टेकडी येथुन राॅयल ईनफिल्ड बुलेट व एक ज्युपिटर मोपेड चोरी केलेली असल्याचे सांगीतले. आरोपी नामे प्रलय कदम व साहील सातपुते तसेच तिन विधी संघर्शीत बालक यांचे ताब्यातून त्यांनी चोरी केलेल्या बुलेट, दोन हिरो होंडा स्प्लेंडर मोटार सायकल, एक अॅसेस मोपेड व एक बजाज 220 पल्सर मोटर सायकल असा एकुण 03,05,000/-रू. चा माल जप्त करण्यात आलेला असून दोन्ही आरोपी व मुद्देमाल पुढील कारवाई करीता पोलीस स्टेषन रामनगर येथे दाखल करण्यात आलेला आहे.

  सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक वर्धा नूरूल हसन, अपर पोलीस अधीक्षक डाॅ. सागर कवडे सा. वर्धा यांचे मार्गदर्षनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड स्थानीक गुन्हे शाखा वर्धा यांचे निर्देषाप्रमाणे पोउपनि अमोल लगड, सलाम कुरेषी, पोलीस अंमलदार नरेंद्र पाराषर, सचीन ईंगोले, राजेष तिवस्कर, अमरदिप पाटील, रामकिसन इप्पर, नितीन ईटकरे, संघसेन कांबळे, अरविंद इंगोले, मिथून जिचकार सर्व स्थानीक गुन्हे षाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये