गुन्हेग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

दानपेटीतील नगदी रोकड चोरी ; आरोपी ताब्यात

संपूर्ण माल जप्त करून गुन्हा उघडकीस

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 21.12.2023 रोजी फिर्यादी श्री. दत्तराज संतराज डोमेग्रामकर रा. कृष्ण मंदिर, तळेगाव रघुजी यांनी पोलीस स्टेशन खरांगणा येथे येऊन तक्रार दिली की, दिनांक 20.12.2023 ते दिनांक 21.12.2023 चे रात्रदरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने श्रीकृष्ण मंदिर, मौजा तळेगाव रघुजी, जि. वर्धा येथील मंदिरातील दानपेटी तील नगदी 40000 रू. चोरुन नेले अश्या रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन खरांगणा अप.क्र. 933/2023 कलम 380 भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद आहे. सदर गुन्ह्याचा संमांतर तपास सायबर पोलीस स्टेशन व सायबर सेल करित असतांना तांत्रिक माहितीचे आधारे व गुप्त बातमीदार यांचे कडून मिळालेल्या माहितनुसार आरोपी संदिप उर्फ रोशन उर्फ बबन रमेश वरघट, रा. मरामाय नगर, काटोल, जिल्हा नागपूर याचा शोध घेवुन ताब्यात घेण्यात आले.

सदर आरोपीस गुन्ह्यासंबंधाने विचारपुस केली असता त्याने त्याचे 4 साथीदारांसह सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्याचे ताब्यातून 1. नगदी 1965 रू. 2. एक ओप्पो कंपनीचा मोबाईल की. 10000 रू. 3. एक Samsung कंपनीचा मोबाईल की. 500 रू. 4. एक स्विफ्ट डिझायर कंपनीची चारचाकी वाहन क्र. MH 04/GD-4316 की 500000 रु ची जप्त करून गुन्हा उघडकीस आणला.

सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक  नूरुल हसन व अपर पोलीस अधीक्षक सागर रतनकुमार कवडे यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक कांचन पांडे सायबर पोलीस स्टेशन वर्धा यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अंमलदार वैभव कट्टोजवार, दिनेश बोथकर, निलेश तेलरांधे, निलेश कट्टोजवार, कुलदीप टांकसाळे, विशाल मडावी, अमित शुक्ला, अक्षय राऊत, गोविंद मुंडे, पवन झाडे, मिना कौरथी, लेखा राठोड, स्मिता महाजन सर्व नेमणूक सायबर वर्धा व वाहन चालक नितीन कांबळे पो.मु.वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये