ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिमस बँकेच्या वरोरा येथील शेतकरी भवनाचे लोकार्पण

चांदा ब्लास्ट

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वरोरा येथील स्वमालकीचे जागेवर शेतकरी बांधवांकरीता शेतीविषयक प्रशिक्षण, कृषी प्रदर्षनी, बचत गटाचे प्रशिक्षण, याचा शेतकरी बांधवांना लाभ होण्याकरीता शेतकरी भवनाचे बांधकांम करण्याचे तसेच या शेतकरी भवनाला लोकनेते तथा महाराष्ट्राचे माजी मंत्री स्व. रा. ज. उपाख्य दादासाहेब देवतळे यांचे नांव देण्याचा ठराव बँकेने संमत केल्यानंतर वरोरा तालुक्यात भव्य असे शेतकरी भवनाचे बांधकाम करण्यांत आले असून दि. ११/०८/२०२३ रोजी स्व. रा. ज. उपाख्य दादासाहेब देवतळे शेतकरी भवनाचे लोकार्पण व सहकार मेळावा आयोजित करण्यांत आलेला आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री. विजयभाउ वडेट्टीवार माजी मंत्री तथा विरोधीपक्ष नेते महाराष्ट्र विधानसभा यांचे शुभहस्ते संप्पन्न होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.  सुभाषभाउ धोटे आमदार, राजुरा विधानसभा क्षेत्र हे आहेत. व प्रमुख अतिथी मा.  सुधाकर अडबाले आमदार विधान परिषद तसेच  संतोषसिंह रावत अध्यक्ष चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर हे असून मा. अॅढ.  पुरूषोत्तम सातपुते अध्यक्ष, धनोजे कुणबी समाज जिल्हा चंद्रपूर मा. श्री. यशवंत दिघोरे उपाध्यक्ष, चंदपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूर मा. श्री. रविंद्र श्रीनिवासराव शिंदे अध्यक्ष, विभागीय कर्ज समिती वरोरा, मा. विजय रा. देवतळे सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती वरोरा तथा संचालक चंद्रपूर जिमस बँक यांचे प्रमुख उपस्थितीत स्व. रा. ज. उपाख्य दादासाहेब देवतळे शेतकरी भवनाचे लोकार्पण सोहळा व सहकार मेळावा संपन्न होत आहे.
तरी जिल्हयातील शेतकरी बांधव, महीला बचत गटांचे सदस्य, बॅकेचे ठेवीदार, हितचितंक, कर्जदार यांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असे बॅकेचे प्र. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आवाहन केले आहे.
शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये