Sudarshan Nimkar
ताज्या घडामोडी

प्रतिबंधीत मांगुर मासोळीचा ट्रक पोलिसांनी केला जप्त

6 टन मास्यांसह ट्रक जप्त - दोन आरोपींना केली अटक

चांदा ब्लास्ट तालुका प्रतिनिधी

आशिष रैच राजुरा

राजुरा शहरात गस्तीवर असलेल्या पोलीस दलातील पोउनि पांडुरंग हाके, डि.बी स्टॉप पोशि महेश बोलगोडवा, पोशि रामराव बिंगेवाड, पोशि योगेश पिदुरकर ह्यांच्या चमुला मिळालेल्या गुप्त महितीनुसार आसिफाबाद मार्गे राजुरा कडे ट्रक क्रा. ए.पी ३९ यु.क्यु २९५९ या वाहनामध्ये शासनाने बंदी केलेले मांगुर मासे अवैधरीत्या वाहतूक होत आहे. सदर गुप्त खबरीची शहनिशा करून गस्ती पथकाने ठाणेदार पोलीस निरीक्षक पारधी माहिती दिली.

ठाणेदार पारधी ह्यांचे कुशल मार्गदर्शनाखाली पोउपनि महेश बोथले, पोउपनि ओमप्रकाश गेडाम, सफाँ खुशाल टेकाम, पोहवा किशोर तुमराम, पोहवा सुनील गौरकार, पोशि महेश बोलगोडवार, पोशि रामराव बिंगेवाड, पोशि योगेश पिदुरकर, पोशि तिरूपती जाधव ह्यांच्या पथकाने सापळा रचुन सदर ट्रकचा पाठलाग करून पकडले असता सदर ट्रकमध्ये राष्ट्रीय हरित लवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधीत केलेले मांगुर (clarius gariepinus) या जातीचे ६ टन मासे आढळुन आल्याने सदर माशाची तपासणी करीता मत्स्यव्यवसाय विभाग चंद्रपुर येथे पत्रव्यवहार केले.

मत्स्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी राजुरा येथे तत्काळ येऊन मास्यांची येवुन तपासणी केली असता सदर मासे हे राष्ट्रीय हरितलवाद नवी दिल्ली यांनी प्रतिबंधीत मांगुर (clarius gariepinus) या जातीचे माशे असल्याचे अभिप्राय दिला. हे मासे मानवी जिवीतास अपायकारक असल्याने मास्यांची विल्हेवाट लावणे गरजेचे असल्याने पोलीस विभागाने मास्यांची दुर्गंधी पसरू नये म्हणुन जेसीबीने अंदाजे ८ फुट खोल खड्डा खोदुन त्यामध्ये जप्त करण्यात आलेले मासे पुरण्यात आले.

प्रतिबंधीत मांगुर मास्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या  ट्रक क्र. ए.पी ३९ यु.क्यु २९९५ चे चालक व त्याचे दोन साथीदार यांचे विरूध्द मत्स्यव्यवसाय अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार भादंविच्या कलम 188, 273 नुसार गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास पोउपनि पांडरग हाके करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये