ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देशी, विदेशी, दारुचा एकूण 5 लाख 6 हजारावर मुद्देमाल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

       दिनांक 29/01/2024 रोजी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा अँटी गँग सेल पथक असे पो.स्टे.वर्धा व राम नगर परीसरात गुन्हेगार चेक व अवैद्य धंदयावर प्रो.रेड कामी पेट्रोलींग करीत असतांना मुखबिरकडुन मिळालेल्या गोपणीय माहितीवरून फूलफैल नगर येथे राहणारे सुदर्शन उर्फ दद्द्या सुनिल जवादे व प्रज्वल उर्फ पज्या सुभाष चाचणे हे संगनमताने त्याचे ताब्यातील सिल्वर रंगाची फॉर्ड गाडी ने लिओ पोर्ट बार नागपुर येथून पवनार मार्गने त्याचे राहते घरी देशी विदेशी दारूसाठा घेवून येत आहे अश्या माहिती वरून त्यांचेवर घेराव टाकुन प्रो रेड केला असता 1) सुदर्शन उर्फ दद्द्या सुनिल जवादे, वय 24 वर्ष, 2) प्रज्वल उर्फ पज्या सुभाष चाचणे, वय 25 वर्षे, रा.दोन्ही फूलफैल, वर्धा त्याचे ताब्यातुन पंचांसमक्ष 1) 02खर्ड्याच्या खोक्यात आफीसर चॉईस ब्लू कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल.च्या 80 सिलबंद शिश्या ज्याचा बेंच न 494/23 दिनांक 25/12/23 प्रतीनग 350 रु. प्रमागणे 28,000 रु, 2) 03खर्डाच्या खोक्यात oc कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 120 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 457 दिनाक 11/12/23 प्रतीनग 300 रु. प्रमाणे 36,000 रु, 3) एका खर्डाच्या खोक्यात RS कंपनीच्या विदेशी दारूने भरलेल्या 180 एम.एल च्या 48 सिलबंद शिक्या ज्याचा बॅच नं 3267 दिनाक 01/01/24 प्रतीनग 350 रु. प्रमाणे 16,800 रु, 4) 02 खर्डाच्या खोक्यात tango पंच कंपनीच्या देशी दारूने भरलेल्या 90 एम एल च्या 245 सिलबंद शिश्या ज्याचा बॅच नं. Rv 730, जाने 24 प्रतीनग 100 रु प्रमाणे 24,500 रु, 5) एक सिल्वर रंगाची फोर्ड कंपनीची कार क्र mh 12 सी आर 9905 की 4,00,000, 6) एक मोबाईल किमत 1000/- रु.असा एकुण जु.कि. 5,06,300/- चा मुद्देमाल जप्त करून दोन्हीं आरोपी यांना जप्त देशी विदेशी दारुबाबत विचारणा केली असता त्याने स्वतः चे कारने जिल्हा नागपुर येथे जाऊन 3) लिओ पोर्ट 9 बार मालक अभिषेक नयन चींतलवार रा. नागपूर (पसार) याचेशी संपर्क करून दारुमाल बार मधील नौकार आरोपी 4) लिओ पोर्ट 9 बार चा नौकर बार सतिश उर्फ माटे गणपत हजारे रा. नागपूर पसार याने काढून दिला अशी माहिती दिली.

सदर आरोपीतांविरुध्द पो.स्टे.  वर्धा येथे गुन्हा नोंद करून तपासात घेतला.

 सदर कारवाई मा. नुरुल हसन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा.  सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. संजय गायकवाड, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्गदर्शनात पो उप नि उमाकांत राठोड, अमोल लगड, पो.हवा. गजानन लामसे, अरविंद येणुरकर, चंद्रकांत बुरंगे, भुषण निघोट, महादेव सानप, रितेश शर्मा, पोलीस अंमलदार गोपाल बावनकर, मंगेश आदे सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये