ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठानचा वार्षिक स्नेह मिलन सोहळा साजरा

चांदा ब्लास्ट 

श्री साई सेवा संकल्प प्रतिष्ठान चंद्रपूर वर्षभर सेवाभाव कार्यात मग्न असते. वर्षभर प्रतिष्ठानच्या माध्यमातून समाजसेवा दया, अध्यात्मिक उपक्रम राबविले जातात. वर्षभर होणाऱ्या सेवेतून प्रतिष्ठानच्या सदस्यांना थोडा विरंगुळा मिळावा व सोबतच संस्थेच्या कुटुंबांना व मित्रमंडळींना प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती मिळावी व प्रतिष्ठान वाढीस मदत व्हावी या अनुषंगाने प्रतिष्ठान तर्फे जिल्ह्यात दरवर्षी स्नेह मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.

यावर्षीचा स्नेह मिलन कार्यक्रम रविवार दिनांक 28 जानेवारी 2024 ला जुनोना येथे निसर्गाच्या सानिध्यात चव्हाण फॉर्म येथे करण्यात आला. स्नेहमिलनाची सुरुवात सदस्यांच्या परिचय सत्राने ने होऊन ऑगस्ट व ऑक्टोबर महिन्यात शिर्डी येथे सेवा प्रदान करणाऱ्या 60 सदस्यांचा सन्मानपत्र व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. त्या सदस्यांचे मनोगत घेण्यात आले सत्कार समारंभा नंतर उपस्थित सर्व सदस्यांनी उस्फूर्तपणे संगीत खुर्ची, फुटबॉल, क्रिकेट, हौजी, अंताक्षरी सहभाग घेऊन आनंद लुटला. सोबतच मनोगत व्यक्त करून प्रतिष्ठानच्या सेवा कार्याला जुळण्याकरिता सदस्यत्व फॉर्म भरून बऱ्याच जणांनी प्रतिष्ठानचे सदस्यत्व घेतले. प्रतिष्ठानच्या वाढीस व सेवा कार्य तत्पर राहण्याचे व मदत करण्यास अनुकूलता दर्शविली.

सुरुची भोजनाचा आस्वाद घेऊन व सर्व खेळातील विजेत्यांना बक्षीस वितरण करून स्नेहमिलनाचा समारोप करण्यात आला. स्नेहमिलनाच्या आयोजनाकरिता संस्थेचे अध्यक्ष सचिन घाटकीने, सचिव प्रमोद, विनोद गोवार दिपे, सचिन बरबटकर, रुपेश महाडोळे, देवेंद्र लांजे, कुणाल खनके, चंदू रणदिवे, पंकज निमजे, सक्षम रणदिवे, भागवत खट्टी, सुरेश सातपुते नेमराज पोडे, प्रकाश नांदा यांनी अथक परिश्रम घेतले संचालन सौ ममता दादूवाडे यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ आशा यादव यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये