ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नाभिक समाजाने संघटित होऊन समाज घडविण्याचे कार्य करावे – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार
ब्रह्मपुरी येथे संत शिरोमणी नगाजी महाराज मूर्तीचे अनावरण
चांदा ब्लास्ट
समाजात जन्मलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून ते मरणापर्यंत सुखदुःखाच्या कार्यात नाभिक समाजाची नाळ जुळली आहे. हा समाज अतिशय प्रामाणिक व समाजाला सौंदर्य प्रदान करणारा स्वच्छतेचा संदेश देणारा सुंदर समाज असून नाभिक समाजाने संघटित होऊन समाज घडविण्याचे कार्य करावे असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथील हत्तिगोटा येथे नाभिक समाज युवा बहुउद्देशिय मंडळ द्वारे आयोजित संत शिरोमणी नगाजी महाराज यांच्या मूर्तीचे अनावरण सोहळा कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.
याप्रसंगी प्रामुख्याने अध्यक्ष म्हणून गडचिरोली चे माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, काँग्रेस कमिटी गडचिरोलीचे माजी अध्यक्ष हनसजी गिलानी,डॉ. संदीप लांजेवार, रवी येसेकर, कृउबा समिती सभापती प्रभाकर सेलोकर , शरद उरकुडे, राजू सूर्यवंशी, हरीश ससानकर, कलाके, लताताई सूर्यवंशी (गेडाम) , अतुल जम्पलवार, प्रामुख्याने उपस्थित होते.
पुढे बोलताना विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, समाजात नाभिक समाजा अत्यल्प प्रमाणात असला तरी मात्र नाभिक समाजाचे सेवाभावी कार्य हे वाख्यानेजोगे आहे. नाभिक समाजाने जुन्या रूढी, प्रथा व अंधश्रद्धेला बाजूला सारून समाजाने प्रगतीची वाट धरावी तसेच आपल्या पाल्यांना उच्च शिक्षणाकरिता प्रवृत्त करून शिक्षित करावे.
असे आवाहनही यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले. तसेच नाभिक समाजाची माझी पूर्वीपासूनच नाळ जोडली असून चिमूर विधानसभेतून आमदार म्हणून निवडून येतात सर्वप्रथम नाभिक समाजाला सभागृह बांधून दिले. त्याचप्रमाणे ब्रह्मपुरी येथील हत्तीगोटा येथील संत शिरोमणी श्रीनगर जी महाराज येथे विकास कार्य करून विदर्भाची काशी म्हणून पुढे नावलौकिकास येईल असे आश्वासन त्यांनी दिले.या समाजाच्या व्यथाची आपणास जाणीव असून नाभिक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली. तर अध्यक्ष भाषणात डॉ. लांजेवार म्हणाली की, नाभिक समाजाने आता प्रत्येक क्षेत्रात उंच भरारी घेतली असून समाजातील प्रत्येक व्यक्ती हा प्रामाणिक सेवा बजावीत आहे.
या समाजातील युवकांनी व्यसनाधीनतेकडे न वळता पुढाकार घेऊन समाज उन्नतीसाठी प्रयत्न करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले. ब्रह्मपुरी तालुका नाभिक समाजाच्या वतीने हत्ती गोटा येथे बांधण्यात आलेल्या संत शिरोमणी नगाजी महाराज मंदिरातील मूर्तीचे अनावरण यावेळी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पार पडले. याप्रसंगी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा नाभिक समाज मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला.