ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिपरी (देश) येथे २ दिवसीय स्नेहसंमेलन सोहळा व आनंद मेळाव्याचे आयोजन

पिपरे येथील संपूर्ण ग्रामवसियांच्या वतीने नगर भोजनाचा कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

              प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून २५ व २६ जानेवारी रोजी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यांमध्ये २५ ला आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले, विद्यार्थ्यांनी विविध पदार्थ बनवून त्याची विक्री केली.

२६ ला सकाळी गावात प्रभातफेरी काढण्यात आली व ध्वजारोहण करण्यात आले. नंतर महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम व विविध स्पर्धा घेण्यात आल्या. नंतर संपूर्ण ग्रामवसियांच्या वतीने नगर भोजन करण्यात आले नंतर सायंकाळी विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले. यावेळी शाळेचे माजी शिक्षक श्री प्रकाश खासरे सर ,केंद्रप्रमुख यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.या दोन दिवसीय कार्यक्रमात जिल्हा परिषद शाळा पिपरीच्या विद्यार्थ्यांच्या विविध गुणांना वाव मिळाला

यावेळी मोहन दर्वे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती, अर्चना नांदे सरपंच,श्री मशीलकर सर मुख्याध्यापक, संदीप कुटेमाटे,सौ सुनीता ठोंबरे, संदीप भाऊराव कुटेमाटे, अविनाश चौधरी, शामसुंदर मत्ते,अमोल क्षीरसागर,रामटेके सर, भगत सर, उपगल्लावार मॅडम, चंद्रकला कुटेमाटे, सुनीता दर्वे, कविता कुटेमाटे,सौ सुमन कुटेमाटे,शंकर नांदे,अक्षय कुटेमाटे,दिलीप चौधरी,हेमंत बोबडे यासोबतच गावातील नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये