ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड तर्फे बोलक्या चित्रानी रंगवली बैलमपूर येथील जिल्हा परिषद शाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ आपल्या सामाजिक दायित्व द्वारे आजूबाजूच्या गावाचा मुलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष देत आहे. आज बैलमपूर येथील जिल्हा परिषद शाळेत बोलके चित्र काढून पूर्ण शाळेचि इमारत रंगविण्यात आली.

या रंगरंगोटी मध्ये देशाचा, राज्याचा,जिल्हाच्या नकाशा,पाणी वाचवा संदेश,गणिताचे सूत्र, पाढे, फळ, पक्षी यांची ओळख,वृक्षारोपण महत्व, अल्फाबेट्स, बेरीज -वाजबाकी -गुणाकार – भागकार सूत्र, नीटनेटकेपणा आशा प्रकारे खूप माहिती चित्राद्वारे शाळेच्या इमारतीवरती रंगविण्यात आले.

या चित्र रंगरंगोटीने गावाची व शाळेची सुंदरता वाढली तर मुलांमध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. मुलांच्या व शिक्षकांच्या मनात आनंद दिसत होता. शिक्षक व गावकऱ्यांनी या कार्याबद्दल माणिकडचे विशेष आभार मानलेत. या उपक्रमपला यशस्वी करण्यास माणिकगड च्या सी. एस.आर. टीम ने अथक प्रयत्न केलेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये