ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केसूर्लि आणि कुरोडा येथील जि. प.शाळेत विद्यार्थ्यांचे नाविन्यपूर्ण प्रदर्शन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

                 भद्रावती जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये टीआयपी कार्यक्रमांतर्गत गणित आणि भाषा विषयांचे नाविन्यपूर्ण प्रदर्शनं भरवण्यात आले. भाषा विषयांत मुलांनी गोष्टीचे पुस्तक तर गणित विषयात अपूर्णांकाचे वेगवेगळे मॉडेल तयार करून आपली चमक दाखवली. या प्रदर्शनाची सुरुवात कुरोडा आणि केसुर्लि शाळेतील प्रभात फेरीने करण्यात आली. यात विद्यार्थ्यांनी दिलेल्या घोषणाने गावकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले.

भद्रावती पंचायत समिती अंतर्गत भद्रावती केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये भाषा आणि गणित विषयाचे प्रदर्शन दिनांक 13 फेब्रुवारी ला केसूरली आणि कुरोडा येथे भरवण्यात आले.

        दोन्ही शाळांमध्ये प्रदर्शनीचे आयोजन सिखे फाउंडेशन मुंबई, आणि जिल्हा परिषद शिक्षण विभाग चंद्रपूर यांच्या संयुक्त माध्यमाने सुरू असलेल्या TIP ( Teacher Innovetor Programm) या उपक्रमाच्या माध्यमातून सदर करण्यात आलेले होते. यामध्ये भाषा व गणिता विषयी गोडी निर्माण व्हावी, भाषेची शब्दसंपत्ती वाढावी, विद्यार्थ्यांना अभिव्यक्त होण्यास संधी मिळावी, त्यांच्या विचारांना, कल्पनांना वाव मिळावा, विद्यार्थ्यांना भाषा आणि गणित विषय शिकताना येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्यात, विद्यार्थी बोलके व्हावे इत्यादी उद्देश साध्य करण्यासाठी सदर TIP उपक्रम मागील 3 वर्षांपासून सुरू आहे. यावर्षी शिक्षकांना जुलै आणि ऑक्टोबर 2023 मध्ये प्रत्येकी दोन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर प्रत्येक शाळेमध्ये दिलेल्या प्रशिक्षणाचे माध्यमातून विद्यार्थ्यांसोबत उपक्रम राबविण्यात आले. वर्षभर राबविण्यात आलेल्या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध गोष्टी, लिहिलेल्या गोष्टी चे मुखपृष्ठ-मलपृष्ठ तयार करणे, चित्रावरून गोष्ट तयार करणे, गोष्टीवरून त्यामधील पात्रांचे चित्रण करणे, विविध चित्रे पाहून त्यावरून गोष्ट तयार करणे, मराठी भाषेची शब्दभिंत तयार करणे, स्वतः तयार केलेल्या गोष्टीचे सादरीकरण करणे असे इत्यादी कार्य विद्यार्थ्यांना स्वतः करता यावेत तसेच गणितातील अपूर्णांकाची भीती नाहीशी व्हावी याकरिता शाळास्तरावर प्रदर्शनीचे आयोजन करण्यात येत आहे. प्रदर्शनी सुरू करण्यापूर्वी प्रभात फेरी काढून गावातील सर्व नागरिकांना, पालकांना शाळेतील प्रदर्शनी पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आले.

  याच माध्यमातून कुरोडा आणि केसुरली या जि. प. शाळेमध्ये सादर करण्यात आलेल्या प्रदर्शनीला सर्व शाळेतील शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सदस्य तसेच माता पालक वर्ग उपस्थित झालेला होता.

  प्रदर्शनी यशस्वी करण्याकरिता दोन्ही शाळेचे शिक्षक योगिनी दिघोरे, शारदा गुरले आणि राधिका चौधरी, विद्यार्थी तसेच सिखेचे कोच पल्लवी वाळके यांनी मोलाची भूमिका पार पाडली.

   सदर प्रदर्शनी मध्ये विद्यार्थी आपल्या पालकांना, समिती सदस्यांना तसेच प्रदर्शनी पाहायला आलेल्या सर्व विद्यार्थी आणि नागरिकांना स्वतः तयार केलेल्या कार्याची माहिती देत होते. दोन्ही शाळांमध्ये झालेल्या प्रदर्शनीला महिला वर्गाची उपस्थिती लक्ष वेधून घेत होती. प्रत्येक विद्यार्थी आपले विचार, भावना बोलून दाखविण्याचा प्रयत्न करत होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये