ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्राध्यापक कु. अलका डोंगरे यांना पीएच डी. विद्याविभूषित पदवी बहाल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. गणेश शेंडे

          डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने प्रा.अलका डोंगरे यांना वृतपत्र विद्या व जनसंवाद या विषयातील पीएचडी प्रदान केली आहे. माजी कुलगुरू डॉ .सुधीर गव्हाणे गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महिला सक्षमीकरण विषयक संवाद : एक चिकित्सक अभ्यास’ या विषयावरील प्रबंध सादर केला.

प्रा. अलका डोंगरे या नेट पास असून त्यांना या संशोधनासाठी इंडियन कौन्सील ऑफ़ सोशल सायन्स रीसर्चची ( आयसीएसएसआर, नवीदिल्ली)डॉक्टरल नँशनल फेलोशीप मिळालेली होती. त्यांना अध्यापनाचा आठ-नऊ वर्षांचा मौलाना आझाद संस्थेच्या हॉर्निमन कॉलेजचा अनुभव आहे. विद्यापीठ विभागातही त्यांनी क्लॉक अवर बेसीसवर अध्यापन केलेले आहे. अभ्यासातून महिलांना राजकीय आरक्षण देण्याचा विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी १९३० च्या दशकातच मांडला होता हे स्पष्ट झाले आहे.

महिलाविषयक क़ायदे व हिंदू कोड बीलावरील भाष्य व संवादातून डॉ. आंबेडकर यांनी यच्चयावत महिलांच्या सक्षमीकरणासाठी दिलेले पत्रकारिता या विषयातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलाविषयक मौलिक योगदान या प्रबंधात मांडलेले आहे. डोंगरे कुटुंबातील पहिल्या विद्या विभूषित पदवीधारक आहेत.

पीएच.डी प्राप्त झाल्याबद्दल अलका डोंगरे यांचे सोहनलाल गिधा युके लंडन चेअरमन इंटरनॅशनल बुध्दिस्ट ट्रस्ट जालंदर, पंजाब, चंद्रसेन डोंगरे, विश्वस्त बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पब्लिक स्कूल पुलगाव, अरविंद सोनटक्के आय आर एस इन्कम टॅक्स ऑफिसर मुंबई व संपूर्ण स्कूल स्टाफ मेंबर्स यांनी अभिनंदन केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये