Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

देऊळगाव राजा बस स्थानकाला मिळाले पूर्णवेळ वाहतूक नियंत्रण

आमदार मनोज कायंदे यांची मागणी आगार प्रमुखांनी केली तात्काळ मान्य   

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

पश्चिम विदर्भातील मराठवाडा सीमेलगत असलेल्या देऊळगाव राजा शहराला मोठी बाजारपेठ लाभलेली आहे त्यामुळे येथे प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. येथील बस स्थानकावर अर्धवेळ वाहतूक नियंत्रक होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेला वाहतूक नियंत्रक नसताना येथे प्रवाशांची एकच तारांबळ उडत होती. अशी प्रवाशांनी तक्रार मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्याकडे केली, त्याची तात्काळ दखल घेत विभागीय परिवहन नियंत्रक यांच्याशी संपर्क करून देऊळगाव राजा येथे वाहतूक नियंत्रक पूर्णवेळ देण्याची सूचना केली त्यांनी वरिष्ठाची चर्चा करून देऊळगाव राजा येथे आज पासून पूर्णवेळ वाहतूक नियंत्रण दिल्याने प्रवाशांनी आमदारांचे आभार मानले. विदर्भ मराठवाडा सीमेवर वसलेल्या देऊळगाव राजा शहराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे शहरामध्ये प्रसिद्ध असे प्रति तिरुपती महाराजांचे देवस्थान आहे येथे दर्शनासाठी विदर्भासह महाराष्ट्रातून तसेच परराज्यातून भाविक येत असतात. त्यासह पश्चिम विदर्भातील कापसाची सर्वात मोठी बाजारपेठ देऊळगाव राजा येथे आहे. तसेच शिक्षणाचे माहेरघर म्हणून देऊळगाव राजा शहराची एक आगळी वेगळी ओळख आहे. त्यामुळे येथील बस स्थानकावर हजारो प्रवाशांची ये जा असते परंतु येथे रात्रीला वाहतूक नियंत्रण नसतात त्यामुळे बस स्थानकावर अधिक चौकशी करण्यासाठी कोणाचेही उपस्थिती नसल्यामुळे प्रवाशांची हेळसांड होत होती. रात्रीच्या वेळेला भुरटे चोर आणि काहीसे छोटे-मोठे अनुचित प्रकार सुद्धा या ठिकाणी घडत होते.

काही दिवसापूर्वी एका प्रवाशाचे रात्री झोपेत असताना 40हजार रूपये व मोबाईल चोराने लांबवला,येथील बस स्थानकावरून ग्रामीण भागात 25 ते 30 फेऱ्या असतात. देऊळगाव राजा शहरातून संभाजीनगर, नागपूर राष्ट्रीय महामार्ग गेल्याने रात्रभर येथे प्रवाशांची ये जा असते दिवस आणि रात्रीतून येथील बस स्थानकावरून जलद बसेसच्या 170 ते 180 बस फेऱ्या चालू असतात यामध्ये बहुतांशी फेऱ्या ह्या रात्रीला असल्यामुळे आणि बस स्थानकात वाहतूक नियंत्रण नसल्यामुळे सदर बसचालक आपली बस बस स्थानकात न टाकता सरळ बस स्टॅन्ड चौकातून नेत होते त्यामुळे बहुतांशी वेळी प्रवाशांची बस सुद्धा चुकत होती त्यामुळे बहुतांश प्रवाशांना खाजगी बसचाआधार घेऊन प्रवास करावा लागत होता. तेथेही एस टी महामंडळाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत होते.

याविषयी शहरवासीयांनी खूप वेळेस लेखी निवेदन सुद्धा परिवहन महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते त्याला अद्याप पर्यंत यश आले नव्हते ही बाब नवनिर्वाचित आमदार मनोज कायंदे यांच्या लक्षात आणून देताच त्यांनी तात्काळ विभागीय नियंत्रक यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क करून परिस्थिती सांगितली. विभागीय नियंत्रक यांनी वरिष्ठाची चर्चा करून दिनांक दोन डिसेंबर पासून देऊळगाव राजा येथे पूर्ण वेळ विभागीय नियंत्रक देण्याच्या सूचना केल्या त्या तत्वतः मान्य करून देऊळगाव राजा येथे पूर्णवेळ वाहतूक नियंत्रक मिळाले त्यामुळे शहरवासीयांनी तसेच प्रवासी जनतेने आमदार कायंदे यांचे आभार मानले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये