Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावलीत आशा गटप्रवर्तकाचे आंदोलन

घोषणेची अंमलबजावणी करण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा.शेखर प्यारमवार

अंगणवाडी सेविका सोबत आशा वर्करांचे आंदोनात उडी 

मागील अनेक दिवसापासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आंदोलन सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रातील छोट्या मुलांचा किलबिलाट बंद आहे,त्यातच राज्य सरकारने पगार वाढ संदर्भात दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही त्यामुळे आशा वर्कर आणि गटप्रवर्तक यांनी सरकार विरोधात आंदोलन पुकारले आहेत.

        आशा वर्करांना मागील संपकाळात आश्वासन देत मानधन वाढीची घोषणा केलेले असताना अंमलबजावणी करीत नसल्याने सरकारच्या विरोधात सी.आय.टी.यु संलग्नीत आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीने सावलीत आंदोलन करण्यात आले. तालुका आरोग्य अधिकारी यांचे मार्फतीने शासनाला निवेदन दिले.

      राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत आशा व गटप्रवर्तक काम करतात. मात्र त्यांना कामाचा मोबदला योग्य प्रमाणात देत नसल्याने अनेकदा आंदोलने झाली. त्यानंतर शासनाने आशा वर्करना ७००० व गटप्रवर्कांना १०००० वाढीव मानधन देण्याची घोषणा केली मात्र अजूनपर्यंत या घोषणेची आंमलबजावणी करीत नसल्याने सी.आय.टी.यु. संलग्नीत आशा व गटप्रवर्तक संघटनेकडून ०१ जानेवारीपासून ऑनलाईन कामावर बहिष्कार व १४ जानेवारीपासून कामावर बहिष्कार टाकण्यात आला आहे. आज सावली तहसील कार्यालयासमोर कोरोना काळातील थकित २२ महिण्यांचा कोरोना भत्ता ताबडतोब आशा व गटप्रवर्तक कर्मचाऱ्या खातात जमा करण्यात यावा.

जाहिर करण्यात आलेला दोन हजार दिवाळी बोनस आशाच्या व गटप्रवर्तक यांच्या खात्यात जमा करण्यात यावा, संप काळातील कपात करण्यात आशा व गटप्रवर्तकांचे मानधन देण्यात यावे या मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. आंदोलनात उषा चेनुरकर,सायली बावणे,अर्चना गिरसावरे, सुलभा पाटील,अरुण भेळके,प्रमोद गोळघाटे आदी पदाधिकारी सहभागी होते.उपस्थित आंदोलकांना माजी सभापती विजय कोरेवार यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये