ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोरपना तालुका क्षय मुक्त करू – डॉ. स्वप्नील टेंभे

परिसरातील दहा गावातील सरपंच संघटनेच्या वतीने प्राथमिक आरोग्य केंद्राला दहा बेड भेट देणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

प्राथमिक आरोग्य केंद्र नांदाफाटाच्या वतीने प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत पोषण आहार किट वाटप

 प्राथमिक आरोग्य केंद्र नांदा येथे 17 जानेवारी ला राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत प्रधानमंत्री क्षयमुक्त भारत अभियान अंतर्गत पोषण आहार किट वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. डॉ. स्वप्नील टेंभे, तालुका आरोग्य अधिकारी कोरपना व जिवती होते त्यानी प्रास्ताविक पर मार्गदर्शन केले.या दरम्यान 7 क्षयरुग्णांना पोषण आहार किट वाटप करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती असलेल्या पौर्णिमा श्रीवास्तव, संचालक माडा गृह प्रकल्प कॉलनी संचालक यांनी 3 रुग्णांना दत्तक घेतले, तसेच नांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ संकेत शेंडे यांनी 2 पेशंट तर सी.एच ओ. पूजा डांडेकर अश्विनी राहुलगडे यांनी प्रत्येकी 1 पेशंट दत्तक घेतला.

यावेळी सरपंच संघटनेचे नेते रत्नाकर चटप, नांदा गावचा सरपंचा आवाळपूरचा सरपंचा प्रियंका दिवे उपसरपंच बाळकृष्ण काकडे,हिरापुरचा सरपंच सुनीता तुमराम, सांगोडाच्या सरपंचा संजना बोन्डे अंतरगावचा सरपंचा गीता वाघमारे,तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय येथील राजेश हिरेमठ, आरोग्य सहायक देवलकर, टोंगे,चंद्रशेखर पारखी तथा प्रा.आ. केंद्र नांदा येथील सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये