Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

होली फॅमिली कॉन्व्हेंट स्कूलचा 14 वर्षीय मुला मुलींचा संघ राज्यस्तरावर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

 नुकताच पार पडलेल्या चंद्रपूर येथे महाराष्ट्र शासन द्वारा आयोजित करण्यात आलेले विभागीय स्तरीय वूडबॉल स्पर्धात होली फॅमिली स्कूलच्या एकूण 17 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरावर बाजी मारली आहे पुढल्या महिन्यात बारामती पुणे येथे होणाऱ्या शालेय राज्यस्तरीय वूडबॉल स्पर्धेत सहभागी होणार.

 त्यामध्ये 14 वर्षीय मुलांच्या संघ व मुलींच्या संघ व 17 वर्षीय वयोगटात मुलांमध्ये एकेरी इव्हेंट मध्ये आदित्य तेलजीरे प्रथम तर पियुष धोटे द्वितीय क्रमांक पटकावला आहे व तसेच मुलींमध्ये एकेरीत जेनेसिस फ्रान्सिस तर दुहेरी गटात परि पिदुरकर व दिशा चव्हाण व मिश्र गटात मयूर कळसकर, जान्हवी घोरपडे यांनी प्रथम स्थान प्राप्त करून बाजी मारली आहे एकूण 19 विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय करता निवड झाली आहे याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांनी शाळेच्या प्राचार्य सिस्टर दीपा व उपप्राचार्य सिस्टर टेरेसा क्रीडा शिक्षक/मार्गदर्शक प्रीतम चौधरी सर व जुही शेख मॅडम आणि सर्व शिक्षक बांधव यांना देण्यात आले प्राचार्य दीपा यांही पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये