ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात व्यक्तिमत्व विकास शिबीर संपन्न

 चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ गडचांदूर द्वारा संचालित महात्मा गांधी विज्ञान महाविद्यालयात व्यक्तीमत्व विकास शिबिर नुकतेच पार पडले, व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी प्रमूख वक्ते म्हणून सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार हे उपस्थित होते.

अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रा डॉ पवन चटारे होते तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ अजयकुमार शर्मा उपस्थित होते यावेळी प्रा विजय आकनुरवार यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठी अभ्यासासोबतच आपले चांगले आयुष्य घडण्यासाठी स्वावलंबन, उत्तमचारित्र्य व सामाजिक बांधिलकी व सुसंस्कार निर्माण होणे महत्त्वाचे आहे त्यासाठी कठोर मेहनतीची गरज असल्याचे मत त्यानी व्यक्त केले या कार्यक्रमात अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले या कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन प्रा मनोहर बांदरे यांनी केले यावेळी महाविद्यालयीन विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये