ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा कारागृहातील बंदयासाठी अॅलन स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरु

कारागृहातील बंदी आता स्मार्ट कार्ड फोनवर बोलणार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा कारागृहातील न्यायाधीन व शिक्षा बंदयांसाठी अॅलन स्मार्ट कार्ड फोन सुविधा सुरु करण्यात आली आहे. सदर फोन सुविधेचे उद्घाटन मा.श्री.व्ही.एन. ठाकुर मुख्य न्यायदंडाधिकारी वर्धा यांचे हस्ते करण्यात आलेले आहे. यावेळी कार्यक्रमाकरीता कारागृह अधीक्षक नितीन क्षिरसागर तुरूंगअधीकारी सुहास नागमोते तुरूंगअधिकारी जितेंद्र भावसार उपस्थित होते.

यामध्ये प्रत्येक बंदयाला त्याच्या रक्ताच्या नातेवाइकांशी व वकिलांशी बोलण्यासाठी आठवडयातुन 3 वेळा प्रत्येकी 10 मिनीटे असा फोन कॉल मिळणार आहे. कारागृहात एकुन चार स्मार्ट कार्ड फोन बसविण्यात आले असुन, या माध्यामातुन कारागृहातील सर्वच बंदयाना याचा लाभ घेता येत आहे. ही सुविधा बंदयाना नातेवाइकांशी संपर्कात ठेवण्यासाठी व संवाद साधण्यासाठी आहे.

या सुविधे मुळे दुर गावात तसेच इतर राज्यांमध्ये राहणारे बंदयांचे नातेवाईक यांना कारागृहापर्यत येऊन नाव रजिस्टर करून मुलाखत होइपर्यंत थांबावे लागते होते. वेळ व पैशांचा अपव्यव टाळण्यासाठी ही सुविधा सोयीची ठरली आहे.या स्मार्ट कार्ड फोन मध्ये रेकॉर्डिंग ची सुविधा असून, त्याची तपासणी वेळोवेळी होणार आहे. या फोन कॉलमधुन बंदयानी कौटुंबीयांशी व वकिलांशी संवाद साधुन कौटुंबिक तथा त्यांच्या केसबाबत चर्चा करणे अपेक्षित आहे. या सुविधेचा गैरवापर झाल्यास संबंधित बंदयावर गुन्हा दाखल करण्याची तरतुद करण्यात आली आहे.

मा.श्री.व्ही.एन.ठाकुर मुख्य न्यायदंडाधिकारी वर्धा यांनी जास्तीत जास्त बंदयांना सदर दुरध्वनी सुविधेचा लाभ घेण्याबाबत मार्गदर्शन केलेले आहे. यावेळी कारागृह अधीक्षक श्री. नितीन एस. क्षिरसागर, तुरुगं अधिकारी तु.अ.श्रेणी-1, श्री. सुहास नागमोते तु.अ.श्रेणी-2, श्री. जीतेंद्र भावसार तु.अ.श्रेणी-2, सुभेदार श्री. संजय वंजारी, हवालदार श्री.सी. व्ही. चामलाटे, गिरीश निमकर, अतुल जाधव, अमित कोठारकर, संदीप देशमुख, शंकर वाघमारे भाविनी निमसडे, मयुर चिंदरकर कारागृह शिपाई इत्यादि अस्थित होते.

लाभ घेण्यासाठी आवश्यक दस्तऐवज-

नातेवाइकांचे (आई, वडील, पती, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊबहीण) आधारकार्ड, एस.डी. आर. रिपार्ट इत्यादी बंधनकाराक आहे, (बंदयाच्या नातेवाइकांनी कारागृहाच्या ई-मेल आयडीवरील दस्तऐवज सत्य प्रतीत पाठवावेत. तसेच त्याची मुळ प्रत कारागृहाच्या मुख्यव्दारावर जमा करावी.) असे आव्हान कारागृह अधिक्षक श्री. नितीन एस. क्षिरसागर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये