ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आमदार बंटी भांगडीया यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेचे उद्घाटन संपन्न.

मध्य प्रदेश राज्यातील भोपाळ येथील निरज सोळंकी या धावपटूने प्रथम क्रमांक पटकविला

चांदा ब्लास्ट

     आमदार बंटी भांगडीया  यांच्या हस्ते श्रीहरी बालाजी महाराज मंदिर, देवस्थान चिमूर येथे चिमूर क्रांती मॅराथॉन २०२४ श्रीहरी बालाजी क्रिडा संकुल चिमूर व भारतीय जनता युवा मोर्चा चिमूर द्वारा आयोजीत भव्य खुली दौड स्पर्धेला (१०कि.मी. मॅराथॉन पुरुष खुला गट) हिरवी झेंडी दाखवून सुरवात झाली. या दौड स्पर्धेत संपूर्ण महाराष्ट्रासह इतर राज्यातील एकूण ११३ धावपटूंनी सहभागी होत श्रीहरी बालाजी मंदिर ते पिंपळनेरी गावापर्यंत असे एकूण १० की.मी. अंतर पूर्ण केले.
ही दौड स्पर्धा आटोपल्यानंतर बक्षीस वितरणाचा कार्यक्रम थाटात संपन्न झाला. आमदार बंटी  भांगडीया यांनी उपस्थितांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले व उपस्थित मान्यवरांसह दौड स्पर्धेतील सर्व विजेत्यांना बक्षीस वितरित करण्यात आले. सर्व विजेत्या धावपटूंना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, मेडल्स, ट्रॉफी, प्रशस्तीपत्र व पुष्पगुच्छ प्रदान करून गौरविण्यात आले
श्रीहरी बालाजी क्रीडा संकुलाच्या विविध विकासकामांसाठी एकूण ३५ कोटी रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल  श्रीहरी बालाजी क्रिडा संकुल व भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आमदार बंटी भांगडीया  यांचा स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
     आमदार बंटी भांगडिया यांचे कडून निरज सोळंकी, भोपाळ  यांनी प्रथम क्रमांक प्राप्त करीत ३१००१/- रुपये रोख आमदार  बंटी भांगडीया यांचे कडून), नागराज घुरसुने, नागपूर (रेल्वे) यांनी द्वितीय क्रमांक प्राप्त करीत २१००१/- रुपये रोख आमदार बंटी भांगडीया यांचे कडून) पारितोषिक पटकाविले, उपेंद्र पाल, भोपाळ  यांनी तृतीय क्रमांक प्राप्त करीत ११००१/- रुपये रोख  पारितोषिक पटकाविले.  तर  राजन यादव, नागपूर यांनी चतुर्थ क्रमांक प्राप्त करीत ७००१/- रुपये रोख (स्व. प्रा. सुरेशराव राचलवार यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाजपा युवा नेते समीर  राचलवार यांचे कडून) व अंकित कुमार, नाशिक यांनी पाचवा क्रमांक प्राप्त करीत ५००१/- रुपये रोख (भाजपा ज्येष्ठ नेते स्व. बकारामजी मालोदे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ भाजपा युवा नेते संजय नवघडे यांचे कडून) पारितोषिक पटकाविले.
        चिमूर येथील जवान देशसेवेत इंडियन आर्मी – सियाचीन येथे कार्यरत भूषण खनके  यांच्या मातोश्री वेणूताई खनके, गांधीनगर गुजरात येथे कार्यरत  सुयोग मेहरकुरे  यांच्या मातोश्री लताबाई अशोक मेहरकुरे, बिकानेर राजस्थान येथे कार्यरत प्रतीक टेंभुरकर यांचे वडील देवचंद टेंभुरकर, इंडियन आर्मी अग्निविर (ट्रेनिंग)  प्रणय मेहरकुरे यांचे वडील रामदास मेहरकुरे, बीएसएफ (ट्रेनिंग) – होशियारपूर पंजाब येथे कार्यरत कु. राजश्री वाढई यांची बहीण ज्योती गायधने यांचा व सर्व जवानांच्या कुटूंबियांचा स्मृतिचिन्ह, शाल-श्रीफळ व पुष्पगुच्छ भेट देऊन सत्कार करण्यात आला.
या दौड स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड मॅडम, पोलीस निरीक्षक   गभणे  भाजपा तालुकाध्यक्ष राजू पाटील झाडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष राजू देवतळे, भाजयुमो प्रदेश सचिव मनिष तुंम्पल्लीवार,   तालुका महामंत्री प्रशांत  चिडे,  भिमरावजी ठावरी, समीर राचलवार, सं.गां.नि.अ.यो. समिती अध्यक्ष संजय नवघडे, चिमूर तालुका क्रीडा संकुल सचिव भास्कर बावनकर   अरुण कठाणे,  गिरीश भोपे, रमेश कंचर्लावार, भाजयुमो तालुकाध्यक्ष श्रीरंग  पिसे, भाजयुमो शहराध्यक्ष बंटी वनकर, भाजपा ओबीसी आघाडी तालुकाध्यक्ष एकनाथ थुटे,सतीश जाधव श्रेयस लाखे अमित जुमडे उपस्थित होते. संचालन जयंत गौरकर यांनी केले.
      श्रीहरी बालाजी क्रिडा संकुल व भारतीय जनता युवा मोर्चाचे सर्व सदस्यगण आणि धावपटू, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये