ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पुरोगामी सेवाव्रती उपक्रम अंतर्गत लाखाची सामाजिक दायितत्वाने मदत

एक हात मदतीचा पुण्याचा आणि सेवेचा

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूर शिक्षकांचे व विद्यार्थी हितासाठी सातत्याने निवेदन,आंदोलन,उपोषणाने लढा उभारत आलेली आहे. त्यासोबतच सामाजिक दायित्वाची जाण ठेवून सेवाव्रती उपक्रम सुद्धा राबवित असते.महाराष्ट पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूर चे मुख्य संघटक कविवर्य नरेशकुमार बोरीकर यांचे मुलीला ब्लड कॅन्सरने ग्रासलेले असल्याने ती नागपूर येथे दवाखान्यात उपचारार्थ दाखल आहे.

खर्च आवाक्याबाहेर आहे. आजार अतिशय गंभीर असल्याने पुरोगामी परिवारांनी एक हात मदतीचा पुण्याचा आणि सेवेचा अंतर्गत सहायता निधी जमा करणेसाठी आवाहन केले होते त्या आवाहनाला जिल्ह्यातील शिक्षक बंधुभगिनींनी उदार अंतकरणाने मदत केली. त्यानुसार महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चंद्रपूर चे वतीने ६ जानेवारी २०२४ ला रु.१,००,०००/-(एक लाख) सहायता निधी जमा केलेली आहे. नागपूर येथे तिचेवर उपचार सुरु आहे. तिचे वडील खंबीरपणे तिच्या पाठीशी उभे असून तिच्यासाठी सर्वतोपरी प्रयत्नशील आहे.

मदतीचा हात देणा-या सर्व देणगीदात्यांचे सामाजिक दायित्व बघून पुरोगामी टिम भारावून गेलेली आहे. गंभीर आजारातून सहीसलामत बाहेर काढून तिला उत्तम जीवन जगण्याचं बळ प्रदान करो यासह अनंत शुभकामना संघटनेनी व्यक केले असून सर्व मदतगार सेवाव्रतीचे शतश: धन्यवाद मानले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये