ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

“पणन विषयक एक दिवशीय कार्यशाळाचे आयोजन”

चांदा ब्लास्ट

महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे व राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. २९.०५.२०२५ रोजी सिध्दार्थ हटिल चंद्रपूर येथे चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ व सचिव यांच्या करीता पणन विषयक एक दिवशीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होते.

राज्यातील बहुतांश बाजार समित्यांच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून नविन संचालक मंडळ कार्यरत झालेले आहेत. नुतन सदस्यांना बाजार समितीचे कामकाज करताना कलम ३७ अन्वये बाजार समिती फी चा उपयोग, केंद्र शासनाच्या DMI विभागाच्या कृषि बाजार सुधारणाकरीता असणा-या योजना, बाजार समितीच्या कार्यक्षेत्रातील कृषि उत्पादने, बाजार समितीचे गुणांक पध्दती, कृषि पणन विषयक विविध योजना, स्मार्ट एपीएमसी बाजार सुधारणा व त्यांचा बाजार समितीवर झालेला परीणाम, खाजगी क्षेत्रातील आव्हाने व उपाय योजना याबाबतची सर्वकष माहिती चंद्रपूर जिल्ह्यातील सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती व संचालक मंडळ व सचिव यांना तज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात आले.

सदर कार्यशाळेत उपस्थितींना श्री. सुधीर बनसोड लेखा परीक्षक सहकारी संस्था, श्री. राहुल वाकडे पणन अधिकारी DMI, राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे चे श्री. शेखर कोंडे यतीन गुंडेकर, नवनाथ मोरे तसेच श्री. दिलीप प्यादेकर कृषि पणन तज्ञ म.रा. कृषि पणन मंडळ, नागपूर, यांनी मार्गदर्शन केले.

सदरची कार्यशाळा यशस्वी होण्याकरीता श्री. अजय कडू उपसरव्यवस्थापक म.रा. कृषि पणन मंडळ विभागिय कार्यालय, नागपूर व त्यांचे सर्व अधिकारी/कर्मचारी तसेच श्री. शेखर कोंडे, यतीन गुंडेकर, नवनाच मोरे राष्ट्रीय सुगौ पश्चात तंत्रज्ञान संस्था, तळेगाव दाभाडे, जि. पुणे यांनी यांनी मेहनत घेतली, श्री. संजय पावडे सचिव चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समिती यांचे सहकार्य लाभले

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये