ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लखमापूर येथील शेतकऱ्याची आत्महत्या

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपणा तालुक्यातील लखमापूर येथील येथील शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली गुरुवारला सायंकाळी चार वाजता ही घटना उघडकीस आली.

रामभाऊ हरी शेंडे वय 48 असे मृताचे नाव आहे ते वडिलांच्या 3 एकर शेतीत कापूस तूर व सोयाबीनचे उत्पन्न घेऊन परिवारांचा उद्धव निर्वाह चालवणाऱ्या रामभाऊ शेंडे या शेतकऱ्यांनी सततची नापीकी आर्थिक संकट अवकाळी पाऊस व सावकारी कर्जाच्या विवचनेतून स्वतःच्या राहत्या घरी विष प्राशन केले असता त्यांना ग्रामीण रुग्णालय गडचांदूर येथे भरती करण्यात आले असता प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे रेफर केले असता त्यांचा रस्त्यातच मृत्यु झाला त्यांच्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया लखमापूर येथील 1लाख 60 हजार तर 2 लाख रुपये खाजगी सावकाराचे कर्ज असल्याचे सांगण्यात येते आहे.

त्यांच्या पश्चात वृद्ध वडील एक मुलगा दोन मुली असा बराच मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे लखमापूर या गावात शोककळा पसरली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये