ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद लालगुडा शाळेत महापरिनिर्वाण दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

कोरपना: कोरपना पंचायत समिती अंतर्गत गडचांदूर केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लालगुडा येथे ६ डिसेंबर रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला.

        डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार, बंधुता आणि सामाजिक समता व न्यायाचे पुरस्कर्ते होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीयवाद दूर करण्यासाठी, दीन ,दलित आणि मागासवर्गीयांच्या उन्नतीसाठी समर्पित केले असल्याचे शाळेचे शिक्षक गोविंद पेदेवाड यांनी आपल्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश बोबडे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकून आजही त्यांचे विचार आपल्याला कसे प्रेरणादायी आहेत याबद्दल विचार व्यक्त केले. तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा यावेळी भाषणे दिली.

        याप्रसंगी विद्यार्थ्यांना शाळेतील दूरचित्रवाणीवर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची माहिती दाखवण्यात आली.

         या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची विद्यार्थिनी दिशा मरसकोल्हे तर आभार प्रदर्शन प्रतिक तोडासे याने केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये