कोरपना येथे तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
कोरपना – तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुकास्तरीय रानभाजी महोत्सव कोरपना येथील तहसील कार्यालय सभागृहात पार पडला.
कोरपना तालुक्यात अनेक प्रकारच्या रानभाज्या उपलब्ध आहेत. पारंपरिक ग्रामीण आहाराचा एक महत्त्वाचा भाग असलेल्या रानभाज्यांचे सेवन आरोग्यास अत्यंत उपयुक्त ठरते. जंगलातील या भाज्यांमुळे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. त्याला अधिकाधिक प्रोत्साहन देण्यासाठी रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात येतो.
या महोत्सवात रानातील विविध प्रकारच्या भाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. कोरपना येथील आयोजित या रानभाजी महोत्सवाचे देवराव भोंगळे यांचे हस्ते उद्घघाटन करण्यात आले.
याप्रसंगी तहसीलदार. पल्लवी आखरे, उपविभागीय कृषी अधिकारी जाधव, नायब तहसीलदार, करिष्मा वासेकर, अर्चना भोंगळे, प्रकल्प संचालक अंकुश कुसाडकर, राकाँचे नेते आबिद अली, अरूण मडावी, शहराध्यक्ष अमोल आसेकर, तालुका कृषी अधिकारी गोविंद ठाकूर, कृषी अधिकारी नामदेव राठोड, सर्व सहायक कृषी अधिकारी, प्रमोद कोडापे, अबरार अली, दिनेश ढेंगळे, अविनाश वाभीटकर,विजय रणदिवे, उमेश पालीवाल आदी सह कृषी विभागाचे अधिकारी, तालुक्यातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
					
					
					
					
					


