ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

समर्थ कृषी महाविद्यालयात आरोग्य विषयक चर्चासत्र*

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला संलग्न समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत आरोग्य विषयक समस्या व चर्चा यावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. सखोल मार्गदर्शनासाठी देऊळगाव राजा येथील प्रसिद्ध डॉ. संदीप नागरे, जनरल फिजिशियन तसेच माधवबाग हे डायबिटीस रिव्हर्सल थेरपी यूनिट यशस्वीरित्या चालवणारे सर्वश्रुत असे डॉ. संदीप नागरे हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून लाभले होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना अनेक विद्यार्थी दशेतील समस्यांवर प्रकाश टाकत त्यांनी अभ्यासाचा ताणा मुळे डिप्रेशन तसेच ब्लड प्रेशर, शुगर तसेच अतिरिक्त ताण त्यामुळे हृदयविकार व ओबेसीटी सारखे अनेक समस्या उद्भवू शकतात हे सांगितले व यावर मात करण्यासाठी आहार नियंत्रण, योग्य पूरक आहार व व्यायाम या गोष्टींना प्रत्येकाच्या आयुष्यात अनन्य साधारण महत्त्व आहे हे पटवून दिले. मनाचि एकाग्रता व शांतता मिळण्यासाठी व्यायाम, मेडिटेशन योग्य आहार व गरजेपुरते शारीरिक कष्ट घेण्याची गरज समजून सांगितली व सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तम आरोग्य व यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नितीन मेहेत्रे, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा किरण ठाकरे रा.से.यो. सहकार्यक्रम अधिकारी प्रा.अश्विनी जाधव, प्रा. योगेश चगदाळे, संजय लाड, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये