Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

प्रेरणा व व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळेचे आयोजन

निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालय तसेच हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी.अतुल कोल्हे

              स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयातील विद्यार्थी विकास विभाग व हिंदुस्तान लिव्हर लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने

दोन दिवसीय प्रेरणा व व्यक्तिमत्व विकासावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

या दोन दिवसीय प्रेरणा आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एल एस लडके तर प्रमुख वक्ते श्री स्वामी, मॅनेजिंग डायरेक्टर, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचे मोटिवेशनल स्पीकर व विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे उपस्थित होते.

सर्वप्रथम कार्यक्रमाची सुरुवात द्वीप प्रज्वलन व पाहुण्यांच्या स्वागताने झाली.

 सर्वप्रथम या कार्यशाळेचे प्रास्ताविक या कार्यशाळेच्या आयोजिका डॉक्टर अपर्णा धोटे, विद्यार्थी विकास विभाग प्रमुख यांनी आपल्या व्यक्तीमत्व विकासाची गरज असल्याचे सांगितले व कार्यशाळा आयोजित का केली व त्यामागचे उद्दिष्ट काय आहे हे आपल्या प्रास्ताविकेतून स्पष्ट केले.

सदर कार्यशाळा महाविद्यालयात दोन व 3 जानेवारी 2024 रोजी घेण्यात आली.

तसेच या कार्यशाळेचे प्रमुख वक्ते श्री स्वामी, मॅनेजिंग डायरेक्टर, हिंदुस्तान लिव्हर लिमिटेडचे मोटिवेशनल स्पीकर यांनी मार्गदर्शन करताना आपण जाणतो की प्रत्येक व्यक्तीची वैयक्तिक गरज असते. विकास व्यक्तिमत्व व त्याला अध्यात्माची जोड असली पाहिजे तर अध्यात्माची व्यक्तिरेखा आपल्याला विकसित करणे शक्य आहे, आपण रोज उठून प्राणायाम, योगा, मेडिटेशन करा, असे सांगितले त्यामुळे आपण आपले पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करू शकतो तसेच हे जग सुंदर आहे ते जगता आले पाहिजे, मला जमत नाही असे नाही म्हणता येणार. आपण आत्मविश्वास वाढविला पाहिजे.

तर अधिक उत्साही व्यक्तिमत्वाचा विकास करायचा असेल तर स्वत:ला स्वतःला प्रतिसाद द्या तसेच इतरांप्रती तुम्ही संवादाचा प्रभाव दाखवा, या गोष्टींचा वापर करून आपण आपला व्यक्तिमत्व विकास करू शकतो, असे प्रतिपादन केले. तसेच या व्यक्तिमत्व विकास कार्यशाळेत श्री स्वामी यांनी प्रात्यक्षिक करून आपण व्यक्तिमत्व विकास कसा होतो हे दाखविले.

तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य अध्यक्ष डॉक्‍टर एल. एस लडके यांनी आनंदी व्यक्तिमत्वद्वारे आपल्या विकासाचे संवाद साधावेत, आपण आपले जीवन जगण्यासाठी आपले शब्द टाकू शकतो, जर मैत्रीभाव असेल तर तुमची व्यक्तिमत्व उजळेल तुमच्या जीवनात काही हवे असेल तर तुम्हाला विश्वास बसेल. आपणास कार्यक्षमतेने कार्य करावे लागेल तुमच्याकडे पाहण्यासाठी लोकांना तुमच्यासारखे प्रेरणा देण्यासाठी आत्मविश्वास आणि उत्साह वाढवावा. जीवननिष्ठ विचारांचा स्वीकार करा, असे आपल्या अध्यक्षीय भाषणात विचार व्यक्त केले.

 तसेच या कार्यक्रमाचे संचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर अपर्णा धोटे यांनी तर आभार प्रदर्शन प्राध्यापक सचिन श्रीरामे यांनी केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्राध्यापक कुलदीप भोंगळे, प्राध्यापक सचिन श्रीरामे, प्राध्यापक किरण जुमडे, प्राध्यापक जॉन मॅडम धनश्री नागोसे, प्रगती हेलवटे, ऐश्वर्या काकडे व श्री शरद भावरकर यांनी अथक परिश्रम घेतले.

या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये