चंद्रपूरचांदाब्लास्ट विशेषविदर्भ

जाम टेक्स्टाईल कंपनी मधून तांब्याचे तार चोरणारी टोळी जेरबंद

९ आरोपी अटकेत तर ६ आरोपी फरार ; एकूण 14 लाख 56 हजारावर माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

सविस्तर याप्रमाणे आहे की,जाम ते हिंगणघाट हायवे रोडवर पी. व्ही. टेक्सटाईल कंपनी असून दि.25/11/2021 ते 05/12/2021 चे रात्र दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयांनी कंपनीचे आवारात प्रवेश करून इलेक्ट्रिक चे उपयोगात येणाऱ्या कॉपर केबलचे पाच रोल की. 15 लाख 14 हजार 734/- रू. चा माल चोरून नेल्याचे लक्षात आल्याने सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता.
स्था. गु. शा. वर्धा मार्फत सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असतांना, गुन्ह्याचे घटनास्थळी भेट देऊन पाहणी करुन अश्या प्रकारचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांची गोपनीयरित्या माहिती घेतली असता, सदरचा गुन्हा नौशाद कुरेशी रा. घुग्गुस व प्रतीक उर्फ लाला शिंदे रा. चंद्रपूर यांच्या टोळीने केल्याबाबत विश्वसनीय माहिती मिळाली. त्या आधारे यातील आरोपीतांना निष्पन्न करून स्था. गु. शा. वर्धा चे पथकाने दोन दिवस चंद्रपुरात तळ ठोकून यातील आरोपीतांची माहिती गोळा केली व मुखबीर कडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून गोपनीयरित्या सापळा रचून त्यांना लखामापूर मंदिर, चंद्रपूर परिसरातून  आरोपी नामे प्रतीक उर्फ लाला सुरेश शिंदे (25), गुड्डू श्रीपाल निषाद (21), पवन देवी निषाद (29), विकास सुभाष ढोके (21),भारत देवी निषाद (21), छोटेलाल श्रीपाल निषाद (25), राकेश सुदेश शर्मा (36), अशोक पोचा परचाके (19), मोहम्मद इजाज अब्दुल रहमान (55) सर्व रा. चंद्रपूर यास अत्यंत शिताफीने ताब्यात घेतले.  व नौशाद कुरेशी, कौसर कमलेश यादव, सलमान सर्व रा. घुग्गुस,  बबलू निषाद, अनिल निषाद दोन्ही रा. चंद्रपूर हे फरार आहे. अटकेतील आरोपी यांचाकडून सखोल विचारपूस करून त्यांचे कडून तांबा तार 209 किलो. की.1,67,200/-रु, GI तार 122 kg.व प्लास्टिक केबल ची तुकडे की.9760 रु. टाटा 407 मेटॅडोर, टाटा सुमो गाडी, टाटा झेनॉन व सँट्रो कार अशी चार वाहने की.12,50,000 रु., सहा मोबाईल संच की.30000/- असा जु.की.14 लाख 56 हजार 960/- रू. चा माल वरील प्रमाणे 14 लाख 56 हजार 960 रू. चा माल जप्त करण्यात आला.चोरीच्या मालाची विल्हेवाट लावणारा व चोरीचा माल विकत घेणाऱ्यांसह एकूण नऊ आरोपीतांना अटक करून पुढील तपासकामी पो. स्टे.समुद्रपूर चे ताब्यात देण्यात आले आहे सदर आरोपीतांना अटक करण्याकरिता स्थानिक गुन्हे शाखा,चंद्रपूर येथील फौंजदार संदीप कापडे, संदीप मुळे, नागोसे, चौहाणयांनी खूप मोलाचे सहकार्य केले आहे.

सदरची कामगिरी मा. प्रशांत होळकर, पोलीस अधीक्षक वर्धा, श्री. यशवंत सोळंकी,अपर पोलीस अधीक्षक, पो.नि. श्री. संजय गायकवाड, स्था.गु. शा वर्धा, यांचे मार्गदर्शनात पोउपनि. गोपाल ढोले,पो. हवा.निरंजन वरभे, गजानन लामसे,रणजित काकडे, हमीद शेख, यशवंत गोल्हर, चंदू बुरंगे, राजू तिवसकर,श्रीकांत खडसे,गोपाल बावनकर, अभिजित वाघमारे, राजू जयसिंगपूरे,पो स्टे समुद्रपूर चे अरविंद येनूरकर, निलेश पेटकर, रवी पुरोहित, वैभव चरडे,सायबर सेल चे दिनेश बोथकर, अनुप कावळे, यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button