ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ने.हि.उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरीच्या कुस्तीपटूंची राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये निवड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत विभागीय क्रीडा अधिकारी कार्यालय तथा विभागीय क्रीडा परिषद, नागपूरद्वारे कोराडी येथे संपन्न झालेल्या विभाग स्तरीय शालेय कुस्ती स्पर्धेत नेवजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालय, ब्रम्हपुरीच्या आदित्य किशोर बावनकुळे याने 51 किलो वजन गटात ‘फ्री स्टाईल’ प्रकारात तर तन्मय गजानन कुर्झेकर याने 51 किलो वजन गटात ‘ग्रीको रोमन’ प्रकारात प्रतिस्पर्धी कुस्तीपटूंना धोबीपछाड करित अव्वल स्थान प्राप्त केले. या विजयश्रीमुळे आदित्य आणि तन्मय यांनी राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपला प्रवेश निश्चित केला आहे.

शालेय हॉकी बरोबरच कुस्तीला व कुस्तीपटूंना ने.हि.विद्यालय,ब्रम्हपुरीने सातत्याने प्रोत्साहन दिल्यामुळे आज आदित्य व तन्मय सारखे होतकरू खेळाडू शाळा, तालुका व जिल्ह्याचे राज्यस्तरावर प्रतिनिधित्व करित आहेत.

 विजयी कुस्तीपटू आदित्य व तन्मय तसेच शाळेचे क्रीडा मार्गदर्शक असणारे विद्यालयाचे पर्यवेक्षक ए. डब्लू.नाकाडे, क्रीडा प्रशिक्षक विनोद दिवटे आणि संघ व्यवस्थापक गिरीधर सिंधीमेश्राम यांचे संस्थेचे सचिव अशोकजी भैया तथा संस्थेचे सर्व पदाधिकारी, प्राचार्य के.एम.नाईक,प्रा.पी.आर.जिभकाटे, व्ही.एस.बगमारे,व्ही.एन.वदनलवार,कु.एस.यू.मराठे तसेच सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांनी अभिनंदन केले व राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये