ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदा पब्लिक स्कूल मध्ये दंत तपासणीचे आयोजन

दातांचे विकार होऊ नयेत या हेतूने या तपासणीचे आयोजन

चांदा ब्लास्ट
चांदा पब्लिक स्कूल येथे दि. 27/12/2023 रोजी नर्सरी ते वर्ग 10 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दंत तपासणी’ चे आयोजन करण्यात आले.
आपले आरोग्य हे आपण जे खातो, पितो, ते कसं पचतं यावर अवलंबून आहे. कोणताही पदार्थ किंवा पेय आपल्या पोटात जातं तेव्हा त्याचा पहिला संबंध येतो दात आणि आपल्या मुखाचा.
दात, हिरड्या, जीभ अशा अवयवांचे आरोग्य नीट असेल तरच या अन्नपदार्थ आणि पेयांचा पुढचा प्रवास नीट होतो. त्यामुळे दातांची सुरक्षा अन् सुरक्षेसाठी दातांचे विकार होऊ नयेत या हेतूने या तपासणीचे आयोजन करण्यात आले.
यावेळी शहरातील प्रसिद्ध दंतचिकित्सक डॉ. सुशील मुंधडा, डॉ. शशीकांत बेरशेट्टीवार, डॉ. भार्गव बोंडे, डॉ. दिक्षा देवतळे, डॉ. निहारीका सुरगणी, डॉ. स्वप्नील कोटकर, डॉ. सम्यक दुधे, डॉ. यशकुमार जैन यांनी विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून विद्यार्थ्यांना योग्य तो सल्ला दिला.
यावेळी शाळेच्या संचालिका श्रीमती स्मिता संजय जिवतोडे आणि शाळेच्या प्राचार्या आम्रपाली पडोळे यांनी विद्यार्थ्यांना मुखाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी नियमित दंत तपासणी करण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेचे पर्यवेक्षक महेश गौरकर, शाळेच्या समन्वयक शिल्पा खांडरे, वंदना बोरसरे, स्मृती मून तसेच सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये