ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

संताच्या जीवनचरित्रावर आधारित चित्रपट प्रदर्शित करून सुदृढ समाज घडवावा.  आम. किशोर जोरगेवार

कटिबंध- संत नरहरी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट चंद्रपूर येथे प्रदर्शित

चांदा ब्लास्ट

भगवान शिव व विष्णूंना मानणारे आपल्या देशात वेगवेगळे पंथ आणि परंपरा आहे. फार वर्षापूर्वी ज्या कदाचित एकाच  देवतेच्या उपासनेवर जास्त भर देत होते. हर व हरी हे वेगळे नसून एकच आहे. अशी शिकवण संत नरहरी महाराज यांनी दिली असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी कटिबंध संत नरहरी महाराज यांच्यावर आधारित चित्रपट प्रदर्शन कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रतिपादन केले
वेगवेगळ्या पंथातील  भेदभावावर मात करण्यासाठी आणि हिंदू सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी चंद्रपूर सोनार समाज बहुउद्देशिय संस्थातर्फे कटिबंध संत नरहरी या चित्रपटाचे आयोजन आज रविवार दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सांस्कृतिक सभागृह, चंद्रपूर येथे प्रदर्शित करण्यात आले. प्रदर्शन कार्यक्रमाचे उद्घाटक राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर, माजी जिल्हा परिषद सदस्य संजय गणपुरे, चित्रपट निर्माता संजय जाधव, गोंडवाना विद्यापीठ सिनेट गजपुरे ताई सोनार समाज अध्यक्ष प्रफुल चावरे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलतांना ते म्हणाले कि, महाराष्ट्र हि संताची भूमी आहे. प्रत्येक जाती पंथात थोर संत होऊन गेले जे समाजाला दिशा देणारे प्रमुख होते. समाज अर्थाजन करतांना सतमार्गाचा पालन, सदसदविवेकबुद्धीने वागाव, धर्माचे आचरण करावं आणि मानवाला मानव म्हणून एकमेकांना सहकार्याची भावना नेहमी असावी या साठी त्यांनी कार्य केले आहे. या मध्ये संत नरहरी महराज यांना संतश्रेष्ठ म्हणाले गेले आहे. पूर्वीच्या काळी शिव परंपरा मानणारे आणि वैष्णव परंपरा मानणाऱ्यांमध्ये वाद मोठा वाद होता परंतु त्या काळामध्ये शिव व वैष्णव एक आहे त्यांच्यात कुठलाही भेद नाहीअसे विचार त्यावेळी संत नरहरी महाराज  यांनी  मांडले होते. त्यामुळे समाज एकवटून धार्मिक व आधात्मिक उन्नतीचा एक सोपानमार्ग संत नरहरी महाराज यांनी सर्व समाजांना दाखविला होता.
बदलत्या तंत्रज्ञानाच्या  काळात आजची युवा पिढी धार्मिकतेकडून दुरावली जात असेल तर हे भविष्यासाठी योग्य नाही. त्यामुळे युवकांनीही धार्मिक व आध्यात्मिकतेकडे वळावे त्यासाठी चित्रपटाच्या माध्यमातून संत नरहरी महाराज यांच्यावर आधारित हा चित्रपट आणला आहे. त्यामुळे युवकांना धार्मिक व आध्यात्मिकतेची गोडी लागेल. असे आमदार आमदार जोरगेवार यांनी कार्यक्रमात म्हटले. या प्रसंगी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये