ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्वर्गीय प्रा. दिलीप बोढाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ तनुजा बोढाले यांनी दिव्यांगाना केले अर्थसहाय्य

सामाजिक बांधिलकी जोपासत दिला नवा आदर्श - आमदार सुधाकर अडबाले यांचे प्रतिपादन

चांदा ब्लास्ट

स्वर्गीय दिलीप पांडुरंग बोढाले यांच्या स्मृती प्रित्यर्थ तेरावा स्मृतिदिन कार्यक्रम ज्ञानार्चना अपंग बहुउद्देशीय, संस्था चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शिक्षक आमदार सुधाकर अडबाले, प्रमुख पाहुणे बंडोपंत बोढेकर, सौ. संध्या दानव यांनी मनोगत व्यक्त केले.
आज समाजातील संवेदनशीलता नष्ट होत आहे असे मनोगत व्यक्त करतांना तनुजा बोढाले यांनी “फुल ना फुलाची पाकळी” याप्रमाणे दिव्यांगाना अर्थसहाय्य केले. तनुजा बोढाले या नेहमीच सामाजिक कार्य करत असतात. कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांच्या मनामध्ये आपल्या समाजातील जे दिव्यांग आहे. त्यांच्याबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली. आपणही काहीतरी करावं अशी इच्छा तनुजा बोढाले यांनी व्यक्त केली. आमदार सुधाकर अडबाले म्हणाले, कार्यक्रम अनेक होत राहतात परंतु सामाजिक बांधिलकी जोपासत सामाजापुढे आदर्श उभा करणं हे कौतुकास्पद असते म्हणूनच तनुजा बोढाले यांचे कौतुक वाटते.
बंडोपंत बोढेकर, संध्या दानव सर्वांनी तनुजा बोढाले यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले. संस्थेच्या अध्यक्षा अर्चना मानलवार भोयर यांचे सुद्धा सर्वांनी कौतुक केले. कार्यक्रमाला उपस्थित माया बोडे, अरुणा महातळे, मनीषा कोरडे, अनिता देवगिरीकर, प्रफुल भोयर, दिगंबर देवगिरीकर, वैजयंती गहूकर, संध्या दानव,  ज्योत्स्ना पानघाटे, रवी आञाम,  वडेकर, प्रविण डोये उपस्थित होते.
कार्यक्रमाला दिव्यांग  आश्रयातील सर्व पदाधिकारी तसेच दिव्यांग महिला उपस्थित होत्या. संचालन सविता कोट्टि यांनी केले तर आभार वैशाली रामटेके यांनी व्यक्त केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये