ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भद्रावतीत सूर तेच छेडिता

दिवाळी पहाट संगीत मैफल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

       स्थानिक निळकंठराव शिंदे विज्ञान व कला महाविद्यालयात दि. २९ ऑक्टोंबर रोज मंगळवार ला पहाटे पाच वाजता “सूर तेच छेडिता… दिवाळी पहाट” संगीत मैफल आयोजित करण्यात आलेली आहे. भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांच्या संकल्पनेतून शिक्षणासोबतच कलेशी, कलावंतांशी बांधिलकी जपत, संवर्धित करीत हा संगीतमय कार्यक्रम दिवाळीच्या शुभपर्वावर दरवर्षी आयोजित केल्या जातो.

यानिमित्ताने प्रथितयश गायकांसोबतच परिसरातील नवोदित व होतकरू गायकांना नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्या जात आहे. संगीत रसिक जणांनी या संगीत मैफलचा आस्वाद घ्यावा. असे आवाहन कार्यक्रमाचे आयोजक तथा भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ. विवेक शिंदे यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये