ताज्या घडामोडी

अबब ! घोडपेठ मधे चक्क सरकारी जमिनीची झाली रजिस्ट्री ?

आम आदमी पार्टी भद्रावतीने केला खुलासा

चांदा ब्लास्ट/

अतुल कोल्हे भद्रावती :-
तालुक्यातील घोडपेठ मधे चक्क सरकारी जमिनीची रजिस्ट्री झाली असल्याचा प्रकार समोर आला असुन दिनांक 20 डिसेंबर 2023 रोजी आम आदमी पार्टी भद्रावती तर्फे मा. जिल्हाधिकारी साहेब विनय गौडा यांची भेट घेऊन हा सर्व प्रकार सांगण्यात आला.
भद्रावती तालुक्यातील घोडपेठ मधे चराई करिता सरकारी जमीनीची रजिस्ट्री करण्यात आली अशी तक्रार आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांना प्राप्त झाली. त्यांनी चौकशी केली असता, हा सगळा प्रकार भ्रष्टाचाराची संबंधित आहे असं दिसून आलं. काही पैशांसाठी रजिस्टार साहेब, ग्रामसेवक साहेब, सरपंच साहेब, उपसरपंच साहेब व इतर काही सदस्यांनी मिळून सरकारी जमिनीची रजिस्ट्री एका चाहत्या व्यक्तीला करून दिली अशी बाब उघडकीस आली. तरी या सगळ्या भ्रष्टाचार विषयी चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी आम आदमी पार्टी भद्रावती चे शहराध्यक्ष सुरज शहा यांनी निवेदना द्वारे जिल्हाधिकारी विनय गौडा यांना केली आहे. हे निवेदन देतावेळी आम आदमी पार्टी चंद्रपूर चे जिल्हाध्यक्ष मयूर राईकवर, भद्रावती शहराध्यक्ष सुरज शहा, शहर उपाध्यक्ष सुमित हस्तक, शहर मीडिया प्रभारी आमीर शेख, युवा जिल्हाध्यक्ष राजूभाऊ कुडे, चंद्रपूर महानगर अध्यक्ष योगेश भाऊ गोखरे, चंद्रपूर महानगर महासचिव तब्बसूम शेख व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये