नऊ महिन्यापूर्वी पळून नेलेल्या अल्पवयीन मुलीस छत्तीसगढ राज्यातून आरोपीसह अटक
अल्पवयीन मुलीस घेतले ताब्यात

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
याप्रमाणे आहे की यातील फिर्यादीने दि. ११/०५/२०२४ रोजी पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे तोंडी रिपोर्ट दिला की, त्यांची अल्पवयीन मुलगी वय अंदाजे १७ वर्षे हिला सकाळचे दरम्यान अज्ञात आरोपीने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावुन पळवून नेले. अशा फिर्यादीच्या तोंडी रिपोर्ट वरून पोलीस स्टेशन हिंगणघाट येथे अप क्र. ६१७/२०२४ कलम ३६३, ३७० भादवि प्रमाणे गुन्हा नोंद करुन तपासात घेतला.
सदर गुन्ह्याचा तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा तथा स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांचे मार्फतीने करीत असताना मा. श्री अनुराग जैन पोलीस अधीक्षक वर्धा यांनी दिलेल्या विशेष सूचना व निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शक पथक तयार करण्यात आले.
गुन्ह्यात मुखबिर लावून व तांत्रिक तपास करून यातील आरोपी नामे राम लक्ष्मन देऊळकर, रा. वासी-कोरा ता. समुद्रपूर याचा शोध घेऊन कांकेर (उत्तर बस्तर) राज्य छत्तीसगढ येथे असल्याची खात्री झाल्याने पथक रवाना करून नमूद आरोपीस व यातील पीडित अल्पवयीन मुलीस ताब्यात घेण्यात आले. आरोपी यास रीतसर कायद्याप्रमाणे अटक करण्यात आली असून पुढील तपास पो स्टे हिंगणघाट करीत आहे यातील अल्पवयीन मुलगी रीतसर कायद्याप्रमाणे पोस्टे हिंगणघाट यांच्याकडे देण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक श्री सागर रतनकुमार कवडे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी स्थानिक गुन्हे शाखा तथा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा यांचे मार्गदर्शनात प्रत्यक्ष हजेरीत स.फौ. सुभाष राऊत, पो.हवा. नितेश मेश्राम, म.पो.हवा. शबाना शेख, पो.शि. नवनाथ मुंडे असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष, वर्धा, पो.हवा. अक्षय राऊत, गोविंद मुंडे सायबर सेल वर्धा आणि स्थानिक पोलीस राकेश बघेल कांकेर उत्तर बस्तर राज्य छत्तीसगढ यांनी केली.