ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वाघाच्या हल्ल्यात एक गाय ठार तर दुसरी जखमी

केसुर्ली शेत शिवारातील घटना

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

तालुक्यातील चारगाव, कुरोडा परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाने शहरातील केसुर्ली परिसरात आपला तळ ठोकला असून या वाघाने केसुर्ली परिसरातील एका शेतात एका गाईला ठार मारले आहे. तर दुसऱ्या गाईला जखमी केल्याची घटना भद्रावती शहरालगत असलेल्या केसुर्ली शेतशिवारात घडली. यात सदर शेतकऱ्याचे जवळपास 40 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

केसुर्ली शिवारातील राजू खामकर यांच्या शेतात त्यांची एक जर्सी गाय व दुसरी संकरित जर्सी गाय चरत होती. दुपारच्या वेळेस वाघाने या गायींवर हल्ला केला. त्यात एका गायीचा मृत्यू झाला तर दुसरी गाय जखमी झाली. ही दुधाळ गाय असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेचा वनविभागातर्फे पंचनामा करण्यात आला. त्यानंतर या स्थळावर कॅमेरे लावण्यात आले. या कॅमेऱ्यामध्ये सदर वाघ कैद झाला आहे. हा वाघ गेल्या आठवड्यापासून शहरालगत फिरत आहे. पालिकेच्या घनकचरा प्रकल्पालगत याच वाघाने आठवड्यापूर्वी दर्शन दिले होते.

मात्र हा वाघ अद्यापही शहरालगत फिरत असल्यामुळे शहरातील केसुर्ली व विंजासन भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागातील नागरिकांना बाहेर फिरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन भद्रावती नगरपालिका प्रशासन व वन विभागाने केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये