ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्र शासनाने नियोजित केलेले शासकीय मेडिकल कॉलेज वर्धा येथेच जुनी जिल्हा परिषदचे जागेवर बनवावे

वीर अशोक सम्राट संघटनने जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आम्ही वर्धा जिल्ह्यातील सर्व जनता आपणास विनंती करतो की आपल्या जिल्ह्यात होणारे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे वर्धा या शहरामध्ये हावे कॅच कारण असे की जिल्ह्यात ठिकाण असून जिल्ह्यातील इतर तहसील यांच्यासाठी केंद्रस्थानी आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही तहसील वर अन्याय होणार नाही व सर्वांसाठी सोयीचे ठरेल. इतर जिल्ह्यात शासनाने प्रस्तावित असलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या जिल्ह्याच्याच ठिकाणी योजीलेले आहे. सध्या जिल्ह्यामध्ये हिंगणघाट किंवा आर्वी येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होणेबाबत चढाओढ सुरू झालेली आहे त्यासाठी दोन्ही ठिकाणी वर्धा येथे अगोदरच दोन वैद्यकीय महाविद्यालय असलेले त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.

परंतु येथे असणारी ही वैद्यकीय महाविद्यालय ही खाजगी महाविद्यालय आहे हे मात्र कुणी सांगत नाही. इतर जिल्ह्यातही जिल्ह्याच्या ठिकाणी अगोदरच खाजगी महाविद्यालय असूनही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय त्याच्या शहरात कार्यरत आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व व खाजगी वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये मिळणाऱ्या सुविधा येथील गोरगरीब जनता अनिभिन्न आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिळणाऱ्या सेवा ह्या बहुतांश मोफत असतात व संपूर्ण जिल्ह्यातील गोरगरीब जनतेच्या विचार केला असता वर्धा हे शहरच मुख्य केंद्रस्थानीय आहे व त्याच्या जिल्ह्यातील लोकांना समान फायदा मिळेल व जिल्ह्यातील कोणतेही तालुक्यातील लोकांवर अन्याय होणार नाही सध्या आर्वी किंवा हिंगणघाट या दोन पैकी एका ठिकाणी शासनाने निवडल्यास निश्चितच दुसरे किंवा इतर तहसील शासकीय वैद्यकीय सेवेपासून वंचित राहण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण हे दोन्ही शहर हे एकमेकापासून साधारणत: शंभर किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे सर्वांनाच सोयीचे हे वर्धा शहरच योग्य ठरेल त्यामुळे जनहितार्थ या मागणीची गंभीरताने दखल घ्यावी व आपल्या स्तरावर शासनाकडे पाठपुरा करावा ही नम्र विनंती यासाठी वीर अशोक सम्राट संघटनने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये