ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेन्शन जनक्रांती महामोर्चास मशाल यात्रेने सेवाग्राम येथून संध्याकाळी सुरुवात

लाखोंच्या संख्येने पेन्शनचे त्सुनामी वादळ नागपूरच्या दिशेने मार्गस्थ

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेने हिवाळी अधिवेशनाच्या धर्तीवर १२ डिसेंबर रोजी नागपूर येथे पेन्शन जनक्रांती महामोर्चाचे आयोजन केले असून उद्या सेवाग्राम (वर्धा)येथून मशाल यात्रेने महामोर्चास राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, राज्य पदाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. लाखोंच्या संख्येने राज्यातील कर्मचाऱ्यांचे हे “पेन्शन त्सुनामी वादळ” नागपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आपली ताकत दाखवणार आहे.

मशाल यात्रेच्या माध्यमातून शासनाने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी.पेन्शनसाठी चालू असलेला “तारीख पे तारीख” चा सिलसिला थांबवावा,पोकळ आश्वासन नको तर पेन्शन बहाली हवी, अन्यथा वोट फॉर ओपीएस च्या माध्यमातून सत्तांतर केले जाईल,असा संदेश देणार आहेत.

महाराष्ट्र शासनाने १ नोव्हेंबर २००५ पासून बंद केलेली कर्मचाऱ्यांच्या हक्काची व विश्वासाची जुनी पेन्शन योजना पुन्हा बहाल करावी,म्हणून या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.मागील वर्षीच्या,२७ डिसेंबरला पुकारलेल्या पेन्शन संघर्ष मोर्चात राज्यातील सर्व विभागातील सुमारे साडे तीन लाख कर्मचारी सहभागी झाले होते.यंदाच्या महामोर्चात ती संख्या टिप्पटीने वाढणार असल्याचा प्राथमिक अंदाज आयोजक व संघटनेचे राज्य कोशाध्यक्ष आशुतोष चौधरी यांनी व्यक्त केला आहे.मागील पेन्शन मोर्चामुळे जणजीवन विस्कळीत होऊन पोलीस प्रशासनावर मोठा ताण पडल्याच्या आठवणी प्रशासनाच्या स्मरणात आहेतच.

जुनी पेन्शनच्या या महामोर्चास राज्यभरातील सर्व शासकीय,निमशासकीय प्रमुख संघटनांचा सक्रिय पाठिंबा प्राप्त झाला आहे.आज दुपारपर्यंत ५३ संघटनांचे पाठिंब्याचे पत्र प्राप्त झाले असून उद्या संध्याकाळ पर्यंत अजून वाढण्याची शक्यता आहे.महामोर्चासाठी जिल्हा व तालुकास्तरावर मोठे नियोजन झाले आहे.प्रत्येक तालुक्यातून हजारो कर्मचारी यात सहभागी होणार आहेत.पेन्शन संघटना जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष दररोज चा आढावा राज्य कार्यकरणीस देत आहे. पेन्शन महामोर्चा तयारी म्हणून कर्मचाऱ्यांनी विविध हँड बॅनर,फलक,जुनी पेन्शन टोप्या,झेंडे,वेशभूषा,भजनी मंडळ पथके महिनाभर अगोदरच तयार केली आहेत.

सदर महामोर्चासाठी तीन दिवसीय कार्यक्रम रूपरेषा ठरवण्यात आली आहे. १० डिसेंबरला, सेवाग्राम (वर्धा) येथून संध्याकाळी ५ वाजता मशाल रॅली,११ डिसेंबर,मशाल रॅलीचे नागपूर येथे समापन.१२ डिसेंबर पेन्शन जनक्रांती सभा यशवंत स्टेडियम व लाखोंच्या संख्येने विधानभवनावर महामोर्चा काढण्यात येईल.

पेन्शन महामोर्चाच्या पार्श्वभूमीवर काल संघटनेच्या शिष्टमंडळाने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन चर्चा केली आहे.चर्चेदरम्यान मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी आम्ही जुनी पेन्शन बाबत सकारात्मक असल्याचे सांगितले असून महामोर्चा स्थगित करण्याचे आव्हान देखील केले मात्र जुनी पेन्शन मागणी मान्य होत नाही तोपर्यंत संघटना व कर्मचारी लढ्यावर ठाम राहतील,असे सांगितले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये