Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांनी जगाला नवा दृष्टिकोन मिळाला – डॉ. अनिल चिताडे 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून भारताला समता,बंधुता आणि न्याय यांचा पाया घातला, त्यांच्या क्रांतिकारी विचारांनी जगाला नवा दृष्टिकोन मिळाला असे प्रतिपादन राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालय, चंद्रपूर येथील प्राचार्य तथा गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक प्राचार्य डॉ. अनिल चिताडे यांनी केले महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय येथे आयोजित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले त्यावेळी ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे सचिव धनंजय गोरे, संचालक विठ्ठलराव थीपे, व रामचंद्र सोनपितरे,सेवानिवृत्त प्राचार्य स्मिता चिताडे, प्राचार्य डॉ शैलेश देव,प्राचार्य साईनाथ मेश्राम, उपप्राचार्य प्रफुल्ल माहूरे, उपस्थित होते.

सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले, विठ्ठलराव थिपे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला संचालन प्रा आशिष देरकर यांनी केले.

कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये