ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुभवले रमण विज्ञान केंद्र

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अशोक डोईफोडे

पंचायत समिती कोरपणाअंतर्गत पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा वडगाव या शाळेची शैक्षणिक सहल दिनांक 2 डिसेंबर 2023 ला नागपूर येथील रमण विज्ञान केंद्राला भेट देण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसने गेली होती सदर शैक्षणिक सहलीमध्ये एकूण 61 विद्यार्थी व सात शिक्षक सहभागी झाले होते विद्यार्थ्यांनी रमण विज्ञान केंद्र मधील वैज्ञानिक बाबी समजून घेतल्या तसेच त्या ठिकाणी घेण्यात आलेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये बक्षीस हे सुद्धा मिळविली विद्यार्थ्यांसाठी हा अनुभव अत्यंत दुर्मिळ असा होता त्यानंतर विद्यार्थ्यांना महाराजा बाग येथील बगीचा मध्ये वेगवेगळे प्राणी पाहायला मिळाले तसेच मेट्रो ट्रेन ने देखील प्रवास करण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली यावेळी विद्यार्थ्यांनी मेट्रोचा अविस्मरणीय असा प्रवास केला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अशी संधी मिळणे दुर्मिळ आहे.

तसेच नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ व क्रिकेट स्टेडियम जामठा हे देखील बाह्यरूपाने दाखविण्यात आले एकूणच हा सर्व सहलीचा प्रवास विद्यार्थ्यांसाठी आनंददायी राहिला यावेळी सहल प्रमुख म्हणून काकासाहेब नागरे सहाय्यक शिक्षक यांनी जबाबदारी पार पडली तर मुख्याध्यापक सखाराम परचाके यांनी सहलीला परवानगी दिल्याबद्दल जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी व पंचायत समिती कोरपनाचे गटशिक्षणाधिकारी सचिन कुमार मालवी यांचे आभार मानले तसेच या सहलीच्या यशस्वीते करिता विषय शिक्षक वसंत गोरे शिवाजी माने पुष्पा इरपाते यांनी व अनिल राठोड नितीन जुलमे यांनी सहकार्य केले यावेळी शाळा व्यवस्थापन समिती वडगावचे सर्व पदाधिकारी व पालक बंधू भगिनी यांनी देखील यशस्वी ते करिता प्रयत्न केले व शुभेच्छा दिल्या.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये